सवाई मानसिंह (द्वितीय)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराजा मानसिंह(द्वितीय)
सवाई
जयपूरचे महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय)
जयपूर संस्थानाचा ध्वज
महाराजा सवाई मानसिंह यांची राजमुद्रा
अधिकारकाळ इ.स.१९२२ ते इ.स.१९४८.
राज्याभिषेक १८ सप्टेंबर इ.स.१९२२.
राज्यव्याप्ती सध्याच्या राजस्थान राज्यातील जयपूर विभागातील भाग
राजधानी जयपूर
पूर्ण नाव महाराजा मानसिंह(द्वितीय)
जन्म २१ ऑगस्ट इ.स.१९१२
इसारदा, राजस्थान
मृत्यू २४ जून इ.स. १९७०
सिरेन्सस्टर,इंग्लंड
पूर्वाधिकारी महाराजा माधो सिंह
वडील सवाई सिंह (ठाकूर साहेब)
पत्नी महाराणी गायत्री देवी.
राजघराणे कुशवाहा, जयपूरचे महाराजा
राजब्रीदवाक्य यतो धर्मस्ततो जयः


महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) हे जयपूर संस्थानाचे शेवटचे संस्थानिक होते.

जन्म[संपादन]

सवाई मानसिंह हे कच्छवाह कुळातील राजपूत होते. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१२ या दिवशी झाला.

जीवन[संपादन]

जयपूरचे महाराजा माधो सिंह (द्वितीय) यांनी सवाई मानसिंह (द्वितीय) यांना दत्तक घेतेले होते. सवाई मानसिंह(द्वितीय) हे इ.स.१९२२ ते इ.स.१९४९ या कालावधीत जयपूर संस्थानाचे शासक होते.

सवाई मानसिंह यांच्या पत्नींची नावे महाराणी मरुधर कंवर, महाराणी गायत्री देवी अशी होती. महाराणी मरुधर कंवर आणि महाराणी किशोर कंवर या जोधपूरच्या राजकन्या होत्या. गायत्री देवी या कूच बिहारच्या राजकन्या होत्या.

सवाई मानसिंह यांनी इ.स.१९४९ मध्ये जयपूर संस्थान भारत देशात विलीन केले.

इ.स.१९४९ ते इ.स.१९५६ या कालावधीत ते राजस्थानाचे राजप्रमुख होते. त्यानंतर त्यांनी स्पेन देशात भारतीय राजदूत म्हणून कार्य केले. ते 'पोलो' या खेळातील नामवंत खेळाडू होते.

मृत्यू[संपादन]

सवाई मानसिंह यांचा मृत्यू सिरेन्सस्टर,इंग्लंड येथे २४ जून १९७० या दिवशी झाला.