Jump to content

सरोजिनी शारंगपाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सरोजिनी सारंगपाणी या पानावरून पुनर्निर्देशित)

सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी (१५ ऑगस्ट, १९१७ - १३ नोव्हेंबर, २००१) या एक मराठी लेखिका होत्या. “आहुती', "गुन्हेगारी आणि शासन',“गुन्हेगारांचे जग', “पुरुषप्रधान संस्कृती', "दुर्दैवाशी दोन हात' अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१७ रोजी झाला.


नऊवारी साडी, उंच बांधा, ठसठशीत व्यक्तिमत्त्व असलेल्या सरोजिनीबाईंविषयी एकेकाळी पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आदरयुक्त दबदबा होता.स्त्रीवादी आणि विवेकवादी विचारसरणी हे सरोजिनी शारंगपाणी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य.त्या काळी गुन्हेगारीसारख्या वेगळ्या विषयावर लेखन करणाऱ्या मोजक्या लेखिकांपैकी त्या होत्या. त्यांनी "सरोज प्रकाशन' ही प्रकाशनसंस्थाही काढली आणि विविध विषयांवर व्याख्याने दिली. लेखन आणि वक्तृत्व या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. विवाहानंतर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत मोठ्या जिद्दीने बी.ए. केले. त्या काळी विवाहित स्त्रीने असे शिक्षण घेणे काही सोपे नव्हते. घरकाम, मुलाबाळांचे करून दळणवळणाची फारशी साधने नसताना शिक्षणासाठी आणि लेखनासाठी वणवण करणारी आमची कणखर आई खरोखर विलक्षणच होती.

विवाहानंतर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत मोठ्या जिद्दीने बी.ए. केले. त्या काळी विवाहित स्त्रीने असे शिक्षण घेणे काही सोपे नव्हते. घरकाम, मुलाबाळांचे करून दळणवळणाची फारशी साधने नसताना शिक्षणासाठी आणि लेखनासाठी वणवण करणारी आमची कणखर आई खरोखर विलक्षणच होती.अंध पती नि ओढगस्तीचा संसार. त्यातच भाऊबंदकीतून झालेल्या कलहामुळे डोक्यावरचे छप्पर जाण्याचे आणि संसार रस्त्यावर येण्याचे संकट ओढवलेले. त्या वेळी रणरागिणीप्रमाणे न्यायालयात हेलपाटे मारून तिने लढा दिला आणि जिद्दीने, अक्कलहुशारीने आपले घर मिळवले,

पुस्तके

[संपादन]
  • कुंती (नवल प्रकाशन)
  • गांधारी (नवल प्रकाशन)
  • ब्रह्मास्त्र (नवल प्रकाशन)

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]