Jump to content

सप्त लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेदकालीन ऋषीमुनींनी सप्त लोकांची संकल्पना मांडली आहे. श्रीअरविंद यांनी वेदाध्ययन करून त्याची खुलासेवार मांडणी केली आहे. ते सात लोक पुढीलप्रमाणे -

क्र. लोकाचे नाव व्याहृति तत्त्व इंग्रजी संबंधित कोश अधिक माहिती
०१ भूर्लोक भूः जडद्रव्य (The material World) अन्नमय कोश
०२ भुवर्लोक भुवः जीवन किंवा प्राणतत्त्व (World of pure vitality) प्राणमय कोश या लोकास अंतरिक्ष असेही म्हणतात.
०३ स्वर्लोक स्वः मन (World corresponding to the principle of pure or unobscured mind) मनोमय कोश द्यौ असे म्हणतात.
०४ महालोक महा: / महस् अतिमानस (विज्ञान) (The great world, the world of Truth, Supramental) विज्ञानमय कोश सत्यं-रितम्-बृहत् असे याचे वर्णन केले जाते. अपरार्ध आणि परार्ध यांच्यातील दुवा असे याचे स्वरूप आहे. याला बृहत द्यौ, महो अर्णस् किंवा महाअर्णव असेही म्हणतात. विज्ञानभूमिकेत स्थित असलेल्या आत्म्याला 'महान आत्मा' म्हणतात.
०५ जनलोक जन: शुद्ध आनंद (The world of creative delight of existence) आनंदमय कोश शुद्ध आनंद-भूमिकेत स्थित असलेल्या आत्म्याला 'महाजन आत्मा' म्हणतात.[]
०६ तपोलोक तपः शुद्ध चिच्छक्ती (World of tapas, world of infinite Will or Consciousness-Force) -
०७ सत्यलोक सत्यम् शुद्ध सत्ता. (World of the highest truth of being) - याला महासत्य किंवा महाकारण असे म्हणतात.सत-चित-आनंद या त्रयींचा उल्लेख वेदान्तामध्ये ब्रह्म असा केलेला आढळतो.[]

ही सात तत्त्वे म्हणजे अस्तित्वाच्या विकासाच्या सात पायऱ्या आहेत किंवा चेतनेच्या क्रमशः विकासाचे ते सात टप्पे आहेत, ही गोष्ट वेद, वेदान्तपुराणे या सर्वांनाच मान्य आहे.

संदर्भ

[संपादन]

१) श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन - ले.डॉ.गजानन नारायण जोशी, पुणे विद्यापीठ, प्रकाशन वर्ष - १९८२

२) The Hour of God - Sri Aurobindo, Sri Aurobindo Ashram, Pondicherry, ISBN-13 : 978-81-7058-834-4

  1. ^ a b Sri Aurobindo (2016). Vedic and Philological Studies. THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 14. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.