Jump to content

सदाशिव वसंत गोरक्षकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सदाशिव वसंत गोरक्षकर
जन्म नाव सदाशिव वसंत गोरक्षकर
जन्म इ.स. १९३३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखक,कला समीक्षक,संग्रहालय तज्ञ
पुरस्कार पद्मश्री सन्मान

सदाशिव वसंत गोरक्षकर[] हे ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आणि जतन करण्याबद्दलचे शास्त्राचे तज्ञ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. तेथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित झाले. पेस्तनजी बोमनजी, लाल बहादूर धुरंधर, आबालाल रहिमान, बाबुराव पेंटर या चित्रकारांच्या कलाकृती येथे आहेत. त्यांना २००३मध्ये पद्मश्री हा नागरी सन्मान देउन गौरवण्यात आले.[]

प्रकाशित पुस्तके

[संपादन]
  • डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र
  • राजभवन्स इन महाराष्ट्र
  • अनिमल्स इन इंडियन आर्ट
  • द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया
  • कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया
  • कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ सदाशिव गोरक्षकर-Maharashtra Times. Maharashtra Times. 18-11-2018 रोजी पाहिले. इतिहासात रमणारे अनेक आहेत. मात्र, एकीकडे त्यात मनसोक्त रमत त्याचा मौलिक मागोवा घेत असतानाच, दुसऱ्या बाजूला या इतिहासाचा संवाद वर्तमानातील पिढ्यांशी व्हावा असा ध्यास असलेल्या व्यक्ती विरळाच. त्यामुळेच महाराष्ट्राचाच नव्हे, तर भारताच्या इतिहासाची जपणूक करण्यात हयात घालवणारे सदाशिव गोरक्षकर हे नाव उठून दिसते. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ भारताच्या इतिहासाची जपणूक करण्यात हयात घालवणारे सदाशिव गोरक्षकर[मृत दुवा] Maharashtra Times | Updated: Aug 27, 2016,