Jump to content

सदस्य चर्चा:Supsonawanewiki

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभा सोनवणे या लेखिका, कवयित्री, संपादक असून अनेक काव्यसंस्थांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५६ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. जन्म स्थळ- वाडा जिल्हा पालघर. शिक्षण- एम.ए.(मराठी)- पुणे विद्यापीठ. शालेय जीवनापासूनच कविता कथा लेखनास सुरुवात. विद्याधाम प्रशाला- शिरूर येथे इयत्ता आठवीत असताना हस्तलिखितासाठी पहिली कथा व कविता लिहिली. १९७५ पासून विविध साप्ताहिकातून ,मासिकातून, दिवाळी अंकांमधून सातत्याने कथा /कविता प्रकाशित. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अन्य कवयित्री सह कवितेच्या प्रचार व प्रसारासाठी स्वरचित काव्य सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम केले.

प्रकाशित पुस्तके* (कविता संग्रह)

 १. अनिकेत 
 २. जाईजुई 
 ३. मृगचांदणी 
 ४. मैत्रपंचमी (आत्मकथन- प्रातिनिधिक) 
 ५. ती..ती...आणि ती (पुरस्कार प्राप्त कवितेच्या कार्यक्रमाचे पुस्तक रूपांतर-प्रातिनिधिक)
 ६. स्नेहसावली  (या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे संपादन )
 
 अभिमानश्री हा दिवाळी अंक काही वर्षे प्रकाशित केला.

पुरस्कार*

 १.  कवी कालिदास 
 २.  राष्ट्रगौरव  
 ३.  मदर तेरेसा साहित्य पुरस्कार 
 ४.  कवी केशवकुमार 
 ५.  लळित साहित्य (मृगचांदणीला)
 ७.  बंधुता प्रतिष्ठान साहित्य गौरव
 ८.  साहित्य गौरव 
 ९.  गझलगौरव 
 १०. काव्यदीप (साहित्यदीप संस्था)  
 ११. शिवांजली साहित्य गौरव 
 १२. प्रियदर्शनी इंदिरा (लेखिका पुरस्कार)