सदस्य चर्चा:Aartivadher143

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुलीला फक्त जन्म देऊ नका तर सुरक्षित ठेवा एक चळवळ जाणीव संस्थेची -- आरती वाढेर, विरार

पालघर जिल्हा आणि महाराष्ट्र पोलीसांबरोबर १२ ते १८ वयोगटातील मुलींसाठी मी महाराष्ट्रात भय, स्पर्श, विचार, संस्कार, प्रलोभन, व्यसन, प्रभाव आणि करियर या विषयावर दिड तासाचे जनजागृतीपर व्याख्यान देत आहे. पालघर जिल्हा पोलीसांसमवेत सादर व्याख्यान घेतले जात असून आत्तापर्यंत ३५० शाळा - महाविद्यालयातील १,८५,००० मुलींपर्यत मी पोहोचले आहे. आजपर्यंत ४००० हुन अधिक मुलींचे प्रश्न सोडवण्यात संस्थेच्या माध्यमातून मला यश आले आहे. आजकाल वर्तमानपत्रामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या सर्रास वाचायला मिळतात. समाजाला काळिमा फासणाच्या या घटना असतात या घटना ऐकून संवेदनशीलता, मानवी मन सुन्न होते. कधी कधी या घटना जनतेसमोर येत नाहीत पण दोन वर्षांपूर्वी विरारमध्ये अशीच एक दुर्देवी घटना घडली होती व त्या वाईट घटनेतून एका चांगल्या घटनेचा जन्म झाला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊ नये याची मला जाणीव झाली. आपल्याला झालेली ही जाणीव समाजात विशेषतः सर्वच मुलींना व्हावी, यासाठी माझी धडपड सुरु झाली त्यात मला मिलिंद पोंक्षे यांचे पाठबळ मिळाले. समाज यायच्या आधीच कधीकधी लहान मुलींना अत्याचाराचा सामना करावा लागतो. हे अत्याचारी समाजात सहजसहजी ओळखून येत नाहीत, कारण बऱ्याचदा ते त्या मुलीच्या कुटुंबातील नातेवाईक, शेजारी असेच असतात. घराबाहेर मुलीवर अत्याचार होतात पण घरीदेखील नातेवाईक मुलींचे शोषण करतात. या मुलीवर एकदाच नव्हे तर संधी मिळाल्यावर वारंवार अत्याचार होतात पण भीतीमुळे त्या बोलत नाहीत. अशा मुलींनी ना घाबरता निर्भयपणे पुढे येत अत्याचारायला तोंड द्यायला हवे, त्यांनी आवाज उठवला पाहिजे. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठीच आहे ही जाणीव संस्था. केवळ दोन वर्षात या संस्थेने आपल्या कामाचा अफलातून ठसा उमटवला आहे. ज्यावेळी मी मुलींमध्ये जाणीव निर्माण सुरुवात केली, त्यावेळी माझी खिल्ली देखील उडवली गेली पण मिन डगमगली नाही. मी माझे व्रत सुरुच ठेवले. प्रथम व्याख्यानात मी भय, स्पर्श, विचार, संस्कार, प्रलोभन, आकर्षण, प्रभाव आणि व्यसन असे विषय मांडले हे सारे विषय मुलींना नवे होते पण त्यांना या विषयावर मार्गदर्शन हवेच होते, कारण त्यांची मानसिक कोंडी होत होती. पहिल्याच व्याख्यानात मला हा प्रश्न किती गहाण आहे याची जाणीव झाली, जाणीव म्हणजे मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा.जाणीव म्हणजे समाजामध्ये घडत असणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहायला शिकणे. लहान मुलींना कोणकोणते संभाव्य धोके असतात याची जाणीव करून दिली जाते. चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा, कोणती प्रलोभने दाखवली जाऊ शकतात, त्यापासून दूर कसे राहावे याबाबत मी आणि मिलिंद पोंक्षे शाळाशाळांत जाऊन मुलींना मार्गदर्शन करतात. समाजाचा दुसरा चेहरा किती कुरूप आहे ते दिसते. पण त्यासाठी पाळ्या पालक सुसंवाद, शिक्षक पालक सुसंवाद महत्वाचा आहे, पण तोच आज हरवला आहे म्हणून " स्वतः:ला ओळखा, सावध राहा आणि पुढे चला" असा मंत्र जाणीव संस्था देऊन यासाठी माई मुलींशी संवाद साधत असते. पालघर जिल्हा पोलिसांनी ही हा अनोखा उपक्रम उचलून धरला. त्यात त्यांनीं सक्रिय सहभाव घेतला. पोलीस अधीक्षक शारदा राऊत, मंजुनाथ सिंगे, अपर पोलीस अधीक्षक योगेशकुमार, राज टिलक रोशन हे अधिकारी जातीने व्याख्यानाला उपशीत असतात. व्याख्यानदरम्यान मुलींनी तक्रार केल्यावर तक्रारीनंतर मुलींच्या समस्या ४८ तासाच्या आत पोलिसांतर्फे सोडवल्या जात आहेत. त्यामुळे मुलींना फार मोठा दिलासा मिळतो. आम्ही NOT ONLY SAVE THE GIRL PROTECT THE GIRL आणि चुप्पी तोडो आंदोलन चालवाट असून त्यात महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही यासाठी सोलापूर, रत्नागिरी, जैतापूर, औरंगाबाद, कुडाळ, लातूर, अमरावती, अधिवासी पट्टा, विक्रमगड, तलासरी, डहाणू तसेच नाशिक येथे विनामूल्य शाळा कॉलेजमध्ये जाऊन याचा प्रचार करत आहोत.

आरती वाढेर, विरार, ११ मार्च २०१८, ११:०४ AM

4 मार्च लैंगिक शोषण विरोधी दिवस-- आरती वाढेर दि. १३ मार्च २०१८ , १०:४८[संपादन]

4 मार्च लैंगिक शोषण विरोधी दिवस

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हे वाक्य कितपत संयुक्तिक आहे ? हा आजच्या (02 मार्च 2018) हेल्थी स्टेट्स प्रोग्रेसिव्ह इंडिया नावाच्या नुकताच प्रसिद्ध झालेला लेख वाचल्यानंतर मनात सहजगत्या विचार येऊन जातो की 'बेटी बचाओ' हा संदेश जगभरात वा देशभरात चालु असताना देखील भ्रुणहत्या का होत आहे ? मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी का होत चालली आहे ? याला कदाचित समाजात मुलींवर होणारे लैगिंक अत्याचार, लैंगिक शोषण, बलात्कार हे तर कारण नसावे ? कारण आज दर दिवसाआड न्युज चॅनलवर अथवा वर्तमानपत्रामध्ये किशोरवीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची झळकत असते. तेव्हा 4 मार्च हा दिवस "लैंगिक शोषण विरोधी दिवस" म्हणुन पाळला जातो ते योग्यच आहे असे वाटते, परंतु असा ही दिवस पाळला जावा याची शोकातिंका मनात खळबळ माजवते. कारण लैगिंक शोषण हे मुलींच्या शारिरीकच नव्हे तर मानसिकतेवर सुद्धा घात करणारा, आघात करणारा क्रुर आणि हिंसाचारी प्रकार आहे. समाजात वाढलेले विकृतीचे प्रमाण एवढे लयाला जाईल आणि मुलीला जन्म न देण्याचे कारण 'मुली वंश वाढवू शकत नाही' हा नसुन "मुलीला जन्म दिला तर भावी आयुष्यात तिचा बलात्कार होईल" हे असेल आणि म्हणूनच जर दांपत्य मुलीला जन्म द्यायला घाबरत असतील तर आपला समाज, आपली विचारसरणी, समाजात मुलींसाठी असलेली सुरक्षितता या सगळ्यांचा आज काय परिणाम आहे याचे चित्रच आपल्या नजरेसमोर आहे. नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युरोच्या अहवालानुसार साल 2015 मध्ये देशातील 10, 854 लहान मुली आणि किशोरवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची प्रकरण नोंदवण्यात आली तर 8390 प्रकरणात लैंगिक शोषण करण्याच्या हेतुने मुलींवर हल्ला करण्यात आला. ही आकडेवारी तर नोंदणी झालेल्या प्रकरणाची आहे परंतु अशी कितीतरी प्रकरण असतील ज्याची नोंदणी आणि गणना आपल्याकडे नाही. मुलीला, महिलांना प्रत्येक ठिकाणी लैंगिक अत्याचाराला सामोरे जाण्याचा प्रकार समोर येत आहे. जाणीव संस्थेतर्फे 'किशोरवयीन मुलींची सुरक्षितता' या विषयावर घेतल्या जाणाऱ्या व्याख्यानानुसार असे लक्षात येते कि शेकडो मुली या लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्यांची कुचंबणा, त्यांच्या मनाची तळमळ, त्यांची घुसमट समजुन घ्यायला त्यांच्यासोबत, त्यांच्याबरोबर कोणी ही नाही आणि विश्वासार्ह व्यक्तीचं जेव्हा विश्वासाला तडा जाईल असे अनपेक्षित कृत्य करते तेव्हा विश्वास कोणावर करायचा हा मुलींच्या मनातील प्रश्न हादरवून जातो. जर मुलींवर, महिलांवर होणारे बलात्कार असेच वाढत राहिले तर लैंगिक शोषण विरोधी दिवस जगाला दररोज पाळावा लागेल याची दाहक भीती मनाला वाटते. आणि 4 मार्च हा एकच दिवस जर लैंगिक शोषण विरोधी दिवस म्हणून पाळायचा असेल तर पालकांनी लैंगिकता या विषयावर आपल्या मुला - मुलीसोबत मोकळेपणाने चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या वयात आपल्या पाल्यात होणाऱ्या मानसिक बदलाचा विचार करुन, योग्यरित्या त्यांच्या भावनांना समजुन आपल्यासाठी काय योग्य, काय अयोग्य आहे याची जाणीव त्यांनी आपल्या पाल्यांना करून दिली पाहिजे. लिंग भेद असल्यामुळे होणारे शारीरिक आकर्षण ही एक नैसर्गिक बाब असली तरी कुठे थांबायचे हे मुलांना समजण्यासाठी संवाद हाच योग्य पर्याय आहे असे मला वाटते.

आरती वाढेर दि. १३ मार्च २०१८ , १०:४८