सदस्य:Vishal lingayat

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२७.....फेब्रुवारी कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसानिमित्त.......जागतिक मराठी दिन...,..राजभाषा दिनानिमित्त....सर्व मराठी बांधवांना...हार्दिक शुभेच्छा....

         मराठी भाषेचा मानदंड.....लीळाचरित्र !!!
            मराठी भाषेचा विचार करतांना साहित्याच्या संदर्भात लीळाचरित्र या ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ म्हणून तर या ग्रंथाचे महत्त्व आहेच परंतु चरीत्रग्रंथातही या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. ज्या-ज्या श्रेष्ठ ग्रंथांनी मराठी भाषेचा व मराठी अस्मितेचा साक्षात्कार घडवला त्या श्रेष्ठ ग्रंथांमध्ये लीळाचरित्र हा महानुभाव साहित्याचा व मराठी भाषेचाही श्रेष्ठ ग्रंथ म्हणून उल्लेखनीय आहे. मराठी ही महानुभाव पंथाची धर्मभाषा होती. महानुभाव पंथाचे आचार्य श्री चक्रधर स्वामी हे जन्माने गुजराती होते. पण त्यांनी आपल्या अनुयायांना महाराष्ट्री असावे असा आदेश दिला आणि त्यांच्या शिष्यांनीही तो आग्रहाने अनुसरला. लीळाचरित्र ह्या इ.स. १२०० च्या सुमारास रचलेल्या श्री चक्रधर स्वामींच्या म्हाईंभट रचित चरित्रात केवळ चक्रधर स्वामींचेच नव्हे तर यादव काळातील मराठी भाषेच्या वैविध्यपूर्ण् आविष्कारांचेही दर्शन घडते. ज्या-ज्या ग्रंथांच्या गुणवत्तेविषयी आपण निःशंकपणे बोलू शकतो असा हा मराठीतील आरंभीच्या ग्रंथांमध्ये एक सर्वश्रेष्ठ व महान ग्रंथ म्हणून उल्लेखनीय आहे. याबाबत दुमत नसावे. जनसामान्यांच्या बोली भाषेत तो लिहिला गेल्यामुळे त्याला अस्सल देशीपणा प्राप्त झाला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, प्रेम, वैराग्य, ज्ञान आणि करुणा यांची साक्षात मूर्ती असलेल्या श्री चक्रधर स्वामींचे चरीत्र या ग्रंथांमध्ये रेखाटले आहे. काऊलेयाचे घर सेणाचे ! साळैचे मेणाचे ! ही लीळाचरित्रात आढळणारी काऊचिऊची गोष्ट आजही मराठी घराघरात लहान मुलांना सांगितली जाते.  श्री चक्रधर स्वामींनी समानतेवर भर दिल्यामुळे स्त्रीयांना व शुद्रादीकांनाही त्यांच्या पंथात प्रवेश होता. लीळाचरित्र या ग्रंथाला मराठी भाषेचा मानदंड असे का म्हणावे, तर मराठी ही ज्यांची बोलण्याची, जीवनव्यवहाराची भाषा आहे ती कुठून आली याचा विचार केल्यास साधारणपणे १० व्या ११ व्या शतकापासून ती रुढ झाली असे म्हणावे लागते. लीळाचरित्राचा काळही याच दोन शतकातला समजला जातो . लीळाचरित्र हे आठवणींच्या माध्यमातून आकार घेणारे चरीत्र आहे. प्रत्येक आठवण जे सांगते त्याहूनही अधिक ती सुचविते. त्यामुळे भाष्य अथवा प्रतिपादन न करताही भावार्थ  वाचकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आमच्या महाराष्ट्राची जडणघडण कशी आहे याविषयी प्रथम भाष्य जर कोणी केले असेल, तर ते चक्रधर स्वामींनीच याविषयी कोणाचेही दुमत नसावे.