सदस्य:Vinay.navgire
सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या इतिहासाबद्दल:
सदर माहितीचा संदर्भ " श्री मुक्तेश्वर आख्यान मालिका ग्रंथ " या पुस्तकामधून घेतला आहे
ब्रम्हांड पुराण वर्ण वैभव खंडा मधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे. सोमवंशी आर्य क्षत्रिय वंशोत्पत्ती श्री मुक्तेश्वरापासून झाली असे ब्रह्मदेवांनी नारद मुनीस सांगितले. तसेच श्री व्यास महर्षी यांचे कडून काशी क्षेत्रात हि कथा सांगण्यात आली .
ब्रम्हांड पुराणात जानुमंडळ नावाचा महाभयंकर राक्षसाने मेरू पर्वताच्या शिखरावर उभा राहून कडक तप आचरण करून ब्रह्म देवाला प्रसन्न करून घेतले. त्रिभूवनावर राज्यपद मिळवावे व इंद्रादी देवांकडून नाश होऊ नये असा वर दैत्य Janumandal ला मिळाला. शिव पुत्राकडून तुला मरण येईल असा संदेश पण जानुमंडळ ला मिळाला
दैत्य माजला व अत्याचार करू लागला. इंद्रादी देव भयभीत झाले. विष्णू देवासह सर्व जण शिव शंकराकडे आले. ही हकीकत ऐकून शंकराला राग आला त्यांच्या जठांतून घामाचे थेंब ओघळू लागले. ते थेंब गालावरून ओघळत येताच एक अद्भुत पुरुष त्या थेंबातून निर्माण झाला. हाच तो " श्री मुक्तदेव" होय.
साक्षात श्री शंकर मुक्तदेवाशी बोलले, ते म्हणाले "तुझ्यापासून सोमवंशी आर्य क्षत्रिय वंश सुरु होईल. महाभयंकर जानुमंडळ दैत्याचा नाश तुझ्याकडून होईल. उत्तम सोमवंशी आर्य क्षत्रिय कूळ तुझ्यापासून निर्माण होईल." श्री शंकरा कडून पाशुपतास्त्र व इतर सर्व देवांकडून समस्त शस्त्र श्री मुक्तेश्वराला मिळाले. श्री निमिषांबाची पूजा करून पौंडरिक यज्ञाचा रक्षण करण्यास श्री मुक्तदेव दैत्याशी युद्धाला निघाले
ऋषी मुनींच्या व देवीच्या अनुग्रहाने त्यांनी दैत्याचा संहार केला.तेव्हा देवांनी पुष्प वृष्टी केली. " क्षत्रीयांमध्ये तू शूर आहेस, आर्य देशाचा तू राजा हो." असा श्री शंकराकडून श्री मुक्तदेवाला आशीर्वाद मिळाला. दुर्वासा ऋषींची कन्या प्रभावती बरोबर मुक्तदेवाचा विवाह मोठ्या थाटात झाला. श्री मुक्तेश्वराचा राज्याभिषेक हि महिष्मती नगरीत झाला.
पुत्र प्राप्ती करिता ते नवदम्पत्ती वन क्रीडेस निघाले. वसंत ऋतू असल्यामुळे वन फळा फुलांनी शोभून दिसत होते पुष्पादिकांनी वनातील वृक्ष साथ देत होते. सरोवरच्या काठी " शिवालय " स्थापून विधियुक्त पूजा करून श्री मुक्तदेव ध्यानस्थ बसले. " पुत्राविण व्यर्थ हा संसार " असे समजून श्री मुक्तदेवानी सूर्यदेवाची प्रार्थना केली. " सुलक्षणी असे आठ मुलगे व एक मुलगी होईल " असा आशीर्वाद सुर्यनारायणाकडून श्री मुक्तदेवास मिळाला.
ह्याच वेळेस प्रभावती देवी बरोबर श्री मुक्तेश्वर वनात विहार करत असता एका आंब्याच्या झाडा वर दोन चक्रवाक पक्षी बसले होते. ह्यांची दृष्टी त्या पक्षांवर पडताच क्षणार्धात त्या पक्षांचे रुपांतर दिव्य अशा गंधर्व दम्पतीत झाले. कारण त्या दम्पतींना कश्यप ऋषींचा तसा शाप होता. त्यामुळे पक्षी रूपाने झाडावरच राहत होते.
श्री मुक्तेश्वरा ना आठ मूले व एक मुलगी होती,
या पुत्रांची नावे १) ज्योतीष्मंत २) हंसक ३) बाहुमंत ४) मंदपाल ५) रुक्मवर्ण ६) रुक्मपाल
७) रुक्मभूषण ८) विष्णुदास .. या आठ हि पुत्रांची लग्ने ऋषी कन्यांच्या सोबत झाली.
काही काळाने श्री मुक्तदेवाची भार्या ( पत्नी ) प्रभावती हिला देवाज्ञा झाली. श्री मुक्तदेवाला दाही दिशा ओस पडल्यासारखे झाले. तेव्हा साक्षात श्री शंकरांनी त्यांना उपदेश केला की, " क्षण भंगुर असा प्रपंच आहे, नाशिवंत असे हे शरीर आहे, त्याचा शोक करू नये. कोणती हि वस्तू शाश्वत नसते." अशारितीने आत्मा व ब्रह्म स्वरुपाची माहिती श्री शिवाकडून श्री मुक्तदेवाला मिळाली व वनात जाऊन श्री मुक्तदेव तपश्चर्या करू लागले.
इकडे मुक्तदेवाला वंशातील चित्रक राजाची मूले रूप यौवन युक्त अशा आपल्या बायकांबरोबर नग्न असे जल क्रीडा करीत असता, तपस्वी अशा रोमहर्ष ऋषीला पाहून अपहास्य केले. त्या ऋषींना दगड व मातीच्या गोळ्यांनी मारू लागले. ऋषीला राग आला त्यांनी शाप दिला. "तुम्ही पशु प्रमाणे वागत आहात म्हणून राज्यभ्रष्ट व्हाल." नानापरी विनंती केल्यावर त्यांना ऋषींकडून उ:शाप मिळाला.
" तुम्ही नाना कले मध्ये निपुण व्हाल. चित्रकार, तांबटकार, सुवर्णकार, लोहार, सुतार, व जे जे पाहाल ते ते कला कुसरीचे काम करण्यात तुम्ही प्रवीण व्हाल, असा श्री शिवाचे वरदान तुम्हास मिळेल." असे म्हणून रोमहर्ष ऋषी निघून गेले. म्हणून श्री मुक्तदेवाचे वंशज राज्भ्रष्ट अनाचारी व कष्टी बनले.
आपल्या वंशातील मुलांना शाप मिळाल्याचे श्री मुक्तदेवास कळाले आणि ते श्री शंकरास प्रसन्न करण्यास तप करण्यास गेले. पार्वती सहित श्री शंकर प्रसन्न झाले, म्हणाले " तुझे वंशज राजभ्रष्ट झाले आहेत, पशु सारखे त्यांचे जीवन झाले आहे याला कारण रोमहर्ष ऋषींचा शाप आहे, नित्य वेदोक्त कर्म, संध्यावंदन, धर्मावरण जे करतात. ज्यांना मुंज होते, असे तुजे वंशज सोमवंशी आर्य क्षत्रिय म्हणवून घेतात.
राजदरबारी त्यांना मान मिळतो. हा माझा अक्षय वरदान आहे." असे सांगून मुक्तदेवास व त्यांच्या वंशजास श्री शंकरांनी संतोषविले. मुक्तदेवास कैलासास नेऊन भार्या प्रभावती बरोबर एकत्र मिळविले. असे श्री मुक्तदेव शिवपदास पावले तेव्हा पासून सोमवंशी आर्य क्षत्रिय वंश उद्भवला.
शंकराच्या मानसपुत्रा पासून हा वंश सुरु झाला, म्हणून ह्यांना सोमवंशी आर्य क्षत्रिय असे म्हणतात. रोमहर्ष ऋषींच्या शापामुळे राजभ्रष्ट झाले तरी ते शंकराच्या आशीर्वादाने कलियुगात नाना विविध कला कुसरीची कामे करून व्यापार, उद्योग वगैरे मध्ये हे लोक पुढे आले आहेत. यांना ऋषीचे गोत्र आहेत. वेदोक्त कर्म व यज्ञोपवीत हि या वंशातील पुरुषांना आहे. रुद्र गायत्रीमंत्र , संध्यावंदन, हा आचार आहे.
हे नागरीक उत्तम वंशाचे असून भक्तीने वागतात. मैलारलिंग देव व श्री निमीशांबा देवीची पूजा करतात. शिवाचे ध्यान करतात. हे लोक " सोमवंशी आर्य क्षत्रिय " नावाने ओळखले जातात. वेदात सांगितल्याप्रमाणे द्वितीय वर्ण क्षत्रिय वंशात हे जन्माला येऊन श्री मुक्तेश्वराचे वंशज म्हणवून घेत आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, व कलीयुगापर्यंत हि परंपरा चालत आलेली आहे.
हि मंडळी मृताच्या घरी सुतक पाळतात १२ व्या दिवशी क्रियाकर्म करतात. होम हवन करून विधियुक्त लग्न सोहळा करतात.तीर्थ यात्रा करून व्रत वैकल्ये पाळतात. असे श्री मुक्तदेव आख्यानामधील हि छोटीशी कथा आहे.