सदस्य:V.narsikar/धूळपाटी८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

>>>विकिपीडियावर लेख कसे लिहायचे याचे प्रशिक्षण मी घेतले आहे. <<<

विकिपीडिया वर लेख कसे लिहायचे प्रशिक्षण घेतले आहे हे कोण्या जाणकार व्यक्तिकडूनच घेतले असणार. तो व्यक्ति, ज्यास अनुभव आहे अशाकडून. प्राध्यापकांना /शिक्षकांना शिकविण्याचा अनुभव असतो, विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी याला पर्यायाने कमी अनुभव असतो.तो, त्यांचा अनुभव ग्रहण करतो व त्याप्रमाणे वागतो. थोडक्यात, अनुभवी व्यक्तिचे मार्गदर्शन आवश्यक असते. मग येथे विकिवर जाणत्या सदस्यांकडून तेच करण्यात येत असते.

ज्याप्रमाणे, इतर देशात असतांना तेथील नियम पाळावे लागतात तद्वतच, येथेही आहे. विकिवर असतांना विकिचे नियम पाळणे आवश्यक आहे."कोणीही यावे व टपली मारुनी जावे" असे जरी असले तरी एकंदरीतपणे ते लेख विकिच्या साच्यात बसविणे आवश्यक असते.त्याकरीता अनेक लोकं आपला बहुमोल वेळ खर्ची घालून, मेहनत घेत असतात.कारण येथे केलेले बदल लगेचच दिसतात. एखादा भोंगळ/अस्ताव्यस्त लेख टाकला व त्याचवेळेस एखादा सुज्ञ वाचकाने तो बघितला तर त्याचे मत भलतेच होईल. यासाठी ही खबरदारी घ्यावी लागते कि, चुकीचे लेखन ताबडतोब बदलावे लागते अथवा काढुन टाकावे लागते.वेळ केला तर, एखादेवेळी ते तसेच राहून जायची शक्यता असते. पुन्हा नवनविन लेखक येत असतात, त्यांचेही लेखन दुरुस्त करावे लागते.म्हणून त्याचवेळेस टोकले तर ते बरे असते.कोणीही एकदमच थेट कसोटीत क्रिकेट खेळत नाही.तेथे किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात सहसा, पायरी-पायरीनेच चढावे लागते.

नवागतास त्याचे आकलन थोडे अवघड जाते, मनास पटत नाही, तरीपण, ते आवश्यक आहे.'हा कोण तिसमारखाँ मला शिकविणारा' अशी भावना मनात निर्माण होते.व त्यापासून वादाचे प्रसंग उद्भवतात. अर्थातच येथे लिहायचे असेल तरच. लोकं जितकी मस्ती येथे करतात, तितकी इतर ठिकाणी करुन बघा म्हणा.म्हणजे समजेल.

मुळात समजून घ्यायची वृत्ती हवी. आकस असला तर पुढील माणूस कितीही चांगला असला तरी त्याचे वागणे योग्य वाटत नाही. सांगण्याचा मतितार्थ समजून घ्यावयास हवा. आपण येथील एक स्वयंसेवक आहोत, आपल्या मजकूराने लोकांचे व त्यातल्या त्यात मराठी जनतेचे, आपल्याच भाऊबंदांचे भले होणार आहे असे मनात हवे.एखाद्या लेखास वाचणारे १० लोकं असतील व लेखात दोन चुका असतील तर आधी त्या चुका दहा लोकांपर्यंत, व मग, २०,४० अशा वाढत जातील.काही कालातच ही चुकीची माहिती जगभर पोचेल. म्हणून असा अट्टाहास करण्यात येतो कि विकि बिनचुक असावा.

समजून घ्यायचे झाले तर सर्व काही आहे नाहीतर मग काहीच शिल्लक उरत नाही.

(अपूर्ण)