सदस्य:Umesh Toraskar/S1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                                                             कणेरीमठ                                              

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे . येथील मुख्य भाषा मराठी आहे . येथील महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे . पंचगंगा येथील प्रमुख नदी आहे . शहराच्या आसपास पन्हाळा ,गगनबावडा ,खिद्रापूर , विशाळगड , राधानगरी ,दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत . छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात म्हणजे १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला . कोल्हापूर प्रसिद्ध क्षेत्र आहे.

कोल्हापुरातील मसालेदार पाककृती तिखटपणा यासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत . या भागातील भरपूर नद्या व सुपीक जमीन यामुळे मुख्यतः शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो . पण २०१९ या वर्षाचा विचार केला तर या वर्षी कोल्हापूरकरांना निसर्गाचा झालेला कोप या भीषण पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले . पण अश्या पुरग्रस्थ परिस्थितीवर मात करून कोल्हापूर हे आपल्या रुबाबदार ठेक्यामध्ये उभे आहे .

कोल्हापूर ठिकाणी तांबडा आणि पांढरा रस्सा ,मिसळपाव या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे . तसेच कोल्हापूरची ' कोल्हापुरी चप्पल ' ही खूप प्रसिद्ध आहे . आपुलकीची भावना ही इथल्या लोकांच्या रक्तातच आहे . त्यामुळे कोल्हापूरकर म्हंटल तर महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोठेही कोल्हापुरी माणूस अगदी सहज ओळखला जातो . कोल्हापूर हे शहर अनेक प्रसिद्ध शहरांसाठी प्रसिद्ध आहे . त्यामधील ' कणेरीमठ ' या अतिशय सुंदर स्थळाची माहिती आपण जाणून घेणार आहोत .

कणेरीमठ

कोल्हापूरपासून काही मैल अंतरावर हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे . असे म्हंटले जाते की , लिंगायत धर्माच्या बळावर येथे एक शिवपिंड ची स्थापना नैसर्गिक सौंदर्य असलेल्या या घनदाट अरण्यात झाली . त्यामुळेच हे मंदिर हेमाडपंती आहे . त्याच्या आतील १०' x १०' कोरीव बाजूच्या बाहेरील दोन मंडप आहेत ,या मंडपाची बांधणी मोठ्या व कोरीव दगडात केली आहे . ५०० वर्षांपूर्वी लिंगायत धर्मकार काडसिद्धेश्वर यांनी या मंदिराची बांधणी केली . हे १२५' खोल आहे . संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला भेट दिली व मदतही केली . मुस्लिम धर्माच्या मुख्य मीरासाहेब , ज्या शिवाच्या भक्त होत्या , त्यांनी मिरज येथील टेकडीवर अश्याच प्रकारच्या भव्य दिव्य अश्या सुंदर मंदिराची स्थापना केली .

शिवरात्रीला महाराष्ट्रामधून व कमटक मधून येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात . काडसिद्धेश्वर इन्स्टिटयूट मधून भेट म्हणून येथे काही वेगवेगळ्या योजना आखल्या जातात . त्यांनी काही ४२' मूर्ती आणि काही हत्तीच्या मूर्ती , त्याच प्रमाणे वेगवेगळ्या कालाकृती यांचे पुतळे तयार केले आहेत . या कलाकृतीचा हूबेहूबपणा यामुळे या ठिकाणचे सौंदर्य वाढले आहे . या ठिकाणच्या कलाकृती या पूर्णतः मानवनिर्मित व अतिशय सुंदर आहेत . आपण निरीक्षण केले असता एखादी खरोकर व्यक्तीच आपल्या समोर उभी आहे आहेच आपल्याला वाटेल . या ठिकाणी जाण्यासाठी कोल्हापूर तसेच कागल या ठिकाणाहून प्रवासी बसेस यांची हि सुविधा असते . अश्या या सुंदर व प्रेक्षणीय स्थळाला आपण आवश्य एखादा तरी भेट देऊन तेथील कलाकृती व रमणीय वातावरणाचा लाभ घ्यायला हवा . https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/सहल-कणेरीमठाची-116061100008_1.html