सदस्य:Tukaram Abadar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिथीच्या समर्थकांची संस्कृती-


वाटलं थांबेल आता आमच्या बापाचा अपमान,  वाटल मिटेल आता शिवरायांच्या तारीख-तिथीचा वाद, मोर्चे निघाले लाखो-करोडो दिन-दुबळ्यांच्या हक्काचे, पण शब्दावर ठाम रहातील तेच म्हणावे लेक एका बापाचे, संपला मोर्चा,फिरली पाठ,पुन्हा पक्ष-आदेश न पुन्हा नवी वाट, कोणता पक्ष कोणाची लाट,लाटेत मोडला आमचा कणा ताठ, राजे यांना कसे शहाणे समजता, हे तर चक्क बावळे आहेत, तुम्हाला केलंय देव यांनी तुमची येथे देवळे आहेत, लाज वाटते म्हणून सांगतो राजे,मनाचे मी बोलत नाही, तुमच्यासारख्या कर्तृत्ववान युगपुरुषाची जयंती तिथीने साजरी होतेच कशी?माझ्या बंडखोर मनाला पटत नाही, खूप झाल्या सेना खूप झाले सेनापती,येथे ज्याचा त्याचा झेंडा आहे, तुमच्या विचारांना मात्र राजे सोयीस्कर येथे पक्षीय हृद्यसम्राटांच्या चेल्यांचा ठेंगा आहे... (मराठा क्रांती मोर्चात सहभागी होऊन शिवजयंती तारखेने साजरी व्हावी असे ठराव पारित करून पुन्हा तिथीने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व सकल मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या पक्षीय लाचार मराठा-मराठेतरांना समर्पित... सामान्य मराठा-मराठेतर हे कधीही विसरणार नाही,याची दखल सामान्य मराठा-मराठेतर घेईलच,व समाजाला एकसंध होऊ न देता सतत फुटीच्या मार्गावर नेणाऱ्यांना समाज आज ना उद्या धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही). तुकाराम पाटिल आबादार