Jump to content

सदस्य:Tanvi2211

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                       *मराठी संशोधन मंडळ*
    मराठी संशोधन मंडळ , १ फेब्रुवारी १९४८ रोजी भारताचे अर्थमंत्री आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर कै. सी. डी. देशमुख यांच्या प्रेरणेने , मुंबई मराठी ग्रंथालायासारख्या नामवंत सार्वजनिक ग्रंथालयाचे स्थापन केले.
    मराठी भाषा आणि वाङ्मय याच्या संशोधनासाठी खास स्वतंत्र संशोधन संस्था असायला हवी , अशी सुचना मा. सी. डी. देशमुखांनी केली आणि कै. प्रा. अ. का. प्रियोळकरांच्या अथक परिश्रमाने मंडळ आणि मंडळाचे संशोधनपर कार्य स्थिरावले. ऑक्टोबर १९५३ साली मंडळाने संशोधनाला वाहिलेले त्रैमासिक  प्रा. प्रियोळकरांनी सुरु केले.
   संशोधन मंडळाने ६६ वर्षे आणि मराठी संशोधन पत्रिकेने ६१ वर्षे पूर्ण केली. खडतर आर्थिक परिस्थितीशी सर्वच संचालकांना सामना करावा लागला. अनेक अडचणींवर मात करून मंडळ आणि मंडळाची पत्रिका आ जही सुरु आहे.