सदस्य:Swarupa Amrut Parit

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवशाहीर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हा व्यवसाय आहे. पर्यावरणपूरक विविध चळवळींमध्ये सक्रिय सहभाग सर्पमित्र – सापाबद्दलचे गैरसमज टाळण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम विविध सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय व गीत सादरीकरण शिवाजी विद्यापीठ, आर्किटेक्चर कॉलेज, इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ अशा अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मार्गदर्शक व परीक्षक म्हणून काम करत आहेत. शिवकालीन वस्तू व शस्त्रात्रांचा संग्रह. राजर्षी शाहूंच्या दरबारातील शीघ्रकवी लहरी हैदर, शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या थोर परंपरेत वडील कृष्णाजी राऊत यांच्या प्रेरणेने राजू राऊत यांनी लहानपणापासून शाहीरीचे धडे घेतले. 1997 साली मायावती यांच्या प्रेरणेने लखनौ येथे शाहू मेळ्यामध्ये पदार्पण. त्यानंतर गेल्या 21 वर्षात देशात जवळपास 9 राज्यांमध्ये आणि मॉरिशससारख्या देशामध्ये महाराष्ट्राच्या लोककलेतील रांगड्या पोवाड्यांचे सादरीकरण केले. आजवर जवळपास 1500 हून अधिक शाहिरीचे कार्यक्रम केले आहेत. महाराष्ट्रातील शाहिरीतील बहुतेक सर्व मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. पुणे येथे महाराष्ट्र शाहिरी परिषदेचा ‘युवा शाहीर’ पुरस्कार साता-याचा मानाचा ‘भाऊ फक्कड’ पुरस्कार लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार चित्रतपस्वी भालजी पुरस्कार डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, नेरुळ येथे डी.लिट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1999 साली 325 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगड येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘प्रदीर्घ पोवाडा’ या पुस्तिकेचे प्रकाशन गेल्या 70 वर्षातील पै.लहरी हैदर यांच्यानंतर कर्नाटकच्या शालेय अभ्यासक्रमात इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयामध्ये ‘पोवाड्याचा पोवाडा’ ही रचना क्रमिक पुस्तकामध्ये येणारे दुसरे शाहीर आहेत.