सदस्य:Swapnil jadhav annapur
वंचित आघाडी आणि मातंग समाज
सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मातंग समाजाचे काही संघटना प्रमुख वंचित आघाडीला पाठिंबा देण्यासाठी मातंग समाज सत्ता संपादन मेळावा आयोजित करीत आहे. त्या संदर्भात थोडेसे....
मातंग समाज सत्ता संपादन मेळावा हे नाव खरेच योग्य आहे का ?
बौद्ध समाज सत्ता संपादन मिशनसाठी
मातंग समाज सहकार्य मेळावा हे नाव जास्त उचित वाटते.
नाही का ?
कारण मातंग समाजाला सत्ता मिळणार आहे का ?
की तो फक्त सत्तेत सामील होणार आहे ?
मग तो तर पहिल्यापासून प्रस्थापित पक्षाबरोबर राहून सत्तेत सामील होतच आलेला आहे की.....न्याय व हक्क मिळाला नाही हे मान्य.
पण एखाद्या समाजाला न्याय व हक्क कधी मिळतो तर पूर्ण सत्ता हातात आल्यावर किंवा सत्तेला सुरुंग लावता येईल एवढे तरी उपद्रवमूल्य निर्माण झाल्यावरच...
मातंग समाज सत्ता संपादन मेळावा म्हणजे मातंग समाजाचा मुख्यमंत्री होणार आहे का ? मुख्यमंत्री नाही पण किमान उपमुख्यमंत्री तरी होणार आहे का ?
ही दोन्हीही पदे मिळाली नाही तरी हरकत नाही पण मातंग समाजाला न्याय व हक्क मिळविण्यासाठी वंचित आघाडीवर प्रचंड दबाव टाकता येईल एवढे तरी उपद्रवमूल्य वंचित आघाडीत सामील झालेल्या मातंग समाजाच्या नेत्यांकडे आहे का ?
तर पुन्हा नाही हेच उत्तर येणार.
समजा, वंचित आघाडी कडून मातंग समाजाचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी सत्तेत सामील होतील. पण निवडून येण्याची क्षमता असलेले किती उमेदवार आज रोजी मातंग समाजाचे दिसून येतात ? ते सुद्धा वंचित आघाडीच्या तिकीटावर व त्यांच्या अनिश्चित असलेल्या मतदारांच्या भरवशावर ?
तसेच जे निवडून येतील त्यांना आघाडी झाल्यास कोणते मंत्रीपद मिळेल याची बोलणी झालेली आहे का ?
वंचित आघाडी काँग्रेस बरोबर महाआघाडी करण्यास इच्छुक आहे, त्यामुळे काँग्रेस मागील निवडणूकीत वंचित आघाडीत सामील असलेल्या घटक पक्षांना मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी पाहूनच जागा देणार. फारतर एक दोन जागा जास्त देतील. त्यापेक्षा अधिक शक्यच नाही. कारण कोणताही मोठा राजकीय पक्ष आपल्या दुय्यम दर्जाच्या मित्र पक्षांना कधीच मोठे होऊन देत नसतो. अन्यथा ते मोठे पक्षच काही काळाने दुय्यम दर्जाचे होतात. भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या वीस वर्षातील तथाकथित मैत्रीचा अभ्यास केला तर हे चटकन समजेल. दुय्यम असलेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष शिवसेना व काँग्रेस पेक्षा वरचढ ठरले.
वंचित आघाडीतील घटक पक्षांची मतांची टक्केवारी तर एक टक्का सुद्धा भरत नाही. फक्त हवा केली म्हणजे काँग्रेस जागा देईल असे राजकारणात होते का ?
अशी हवा तर गेली दहा वर्षे राज ठाकरे करतातच की... तरी त्यांच्याशी आजपर्यंत कोणी युती, आघाडी केलेली नाही. त्यांनी किमान हवा तरी टिकवून ठेवली आहे. अशी हवा वंचित आघाडी किती काळ टिकवून ठेवेल ? तर फक्त लोकसभा व विधानसभा निवडणूका होईपर्यंतच...
कारण भीमा कोरेगाव हा मुद्दा निवडणूकी नंतर पूर्णपणे संपणार आहे. मग कोणता मुद्दा घेऊन हवा करणार ? आणि महत्त्वाचे म्हणजे निवडणूक संपल्यावर जूना भावनिक असलेला तेवढाच मुद्दा घेऊन हवा करता येत नाही. उदा.राममंदीर.
भीमा कोरेगाव हा मुद्दा तरी बौद्ध समाज सोडून इतर कोणत्या बहुजन जातींना अपिल झालेला आहे. बहुजन राहू द्या, इतर कोणत्या बौध्देतर दलित जातींना तरी अपिल झालेला आहे ? नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालामुळे एमआयएम या पक्षाकडे तरी आता मुस्लिम समाज आकर्षित होईल का ? ही मोठी शंका वाटत नाही का ? बीएसपी, काँग्रेस बंडखोर यांनाही टक्कर देऊन भाजपचे वर्चस्व असलेल्या हिंदी भाषिक प्रदेशात काँग्रेसचे झालेले पुनरागमन ही वंचित आघाडीसाठी धोक्याची घंटा नाही का ?
मूळात प्रश्न असा निर्माण झाला आहे की वंचित आघाडीला नेमके कोणाला हरवायचे आहे, काँग्रेसला की भाजपला ? हेच अजून वंचित मतदारांना क्लिअर झालेले नाही.
भावनिक होऊन वंचित आघाडीला पाठिंबा देणाऱ्या मातंग नेत्यांना या प्रश्नांची बिनतोड उत्तरे द्यावी लागतील. कारण नावच दिले आहे मातंग समाज सत्ता संपादन मेळावा.....म्हणून मातंग समाजाला उत्तर देणे भाग आहे.
- स्वप्निलभाऊ जाधव
राष्ट्रीय लहुशक्ती
(मुख्य समन्वयक सोशल मिडिया आणि प्रसिध्दी प्रमुख पुणे)[१]
- ^ accounts.google.com https://accounts.google.com/ServiceLogin?service=mail&passive=true&rm=false&continue=https://mail.google.com/mail/&ss=1&scc=1<mpl=default<mplcache=2&emr=1&osid=1#. 2018-12-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)