सदस्य:Swapnil Govardhane

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेतकरी नेते कॉम्रेड आमदार पुंजाबाबा गोवर्धने. पांढऱ्या दाढीचा, हातात काठी घेतलेला, " Old Young Man " त्यावेळच्या विधानसभेचा कुतूहलाचा विषय बनला होता.सत्तेची अभिलाषा नाही.पुढारीपणाचा गर्व नाही.म्हणूनच १९६२ साली त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देण्याचे ठरविले.पण त्यांनी ते नाकारले. " तरुणांना प्राधान्य द्या ", असे बजावले. हा आदर्श बाबांनी जोपासला. आमदारकीच्या काळात आपण केलेल्या व करावयाच्या कामांची त्यांनी स्वतंत्र पुस्तिकाच काढली होती.त्यात त्यांनी इगतपुरी तालुक्याची रचना आणि समस्या त्यावरील उपाय ,रस्ते ,पाणी यावरील उपाय यांचा उहापोह केलेला आहे.शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेल्या सुचना आजही मार्गदर्शक ठरतील.याच तालुक्यातील रेल्वे कर्मचार्यांनाही बाबा त्यावेळी विसरले नाही.त्याचाही या पुस्तकात उल्लेख आहे.इगतपुरी तालुक्यात सावकारशाहीने शेतकऱ्यांना घातलेला विळखा यांचे विश्लेषन मन खिन्न करणारे आहे.याविरुद्ध बाबांनी आंदोलन करून सावकाराच्या पाशातून शेतकरी मुक्त करण्याचा प्रयत्न केला.जमीन बळकाव,बँक राष्ट्रीयकरण आदी पक्षाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनात बाबा सक्रीय सहभागी झाले.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत व इतरही आंदोलनात त्यांनी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला.तालुक्यातील सर्वपक्षीय प्रमुख मंडळींशी सल्लामसलत करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून तालुक्याच्या विकासाला गती दिली होती.हि अभिनव पद्धत त्यांनी त्यावेळीच सुरु केली होती. २०-२२ वर्षाच्या काळात पुंजाबाबांनी उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे सभासद म्हणून किसान सभेच्या संघटनेत आपले उभे आयुष्य वेचले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बाबा हिरिरीने पुढे आले.यातील कामगिरीमुळेच त्यांना १९५७ साली इगतपुरी तालुक्याने आमदार म्हणून निवडून दिले.ही त्यांची कामाची पावतीच होय. या निवडणूक काळात कार्यकर्ते इतके भारावले होते की,ते बाबांबरोबर गावोगावी प्रचारासाठी पायी फिरत.स्वतःच्या भाकरी बांधून प्रचार करीत.बी.डी.जाधव व बाबुराव काळे यांच्या कलापथकाने तर जनजागृतीचे महान कार्य यावेळी केले आणि बाबा प्रचंड मतांनी विजयी झाले .