सदस्य:Sudhaspari
Appearance
स्वातंत्र्य संग्रामात तळोदेकरांचा सहभाग ब्रितिश सत्तेविरुध 1857 पासून सुरु झालेल्या स्वातंत्र्य संग्रामाने खर्या
अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्यासाठी झटण्याची प्रेरणा दिली. ती प्रेरणा घेउन भारतीय तरुण ब्रिटिश सत्ते विरुद्ध आवाज बुलंद लागले, सुरुवातीला लोकमान्य टीळकाच्या वेळे पासूनच ब्रिटिश सत्ते विरुद्धचा असंतोष येथील जनतेत खद्खद्त होता येथील युवकांनी 1928 पासून देश्भाक्तिच्या विविध कार्यक्रमात शामिल होऊंन तो दाखून दिला.चहाचा बहिष्कार,परदेशी कापडाची, होळी दारुबंदी, खादिचा वापर , प्रभात फेरी,गणेशउत्सवातील मेळावे, नाट्यप्रयोग आदि मार्गानी येथील जनता देश प्रेम व्यक्त करत होती. त्यात धरमदास भाट, चोटाभई पटेल, भिक्कन पटेल, उखा तुकाराम आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 1942 मध्ये तलोदा तालुक्यातील अनेक तरुण या स्वातंत्र्य चळवळी कड़े आपसुकच ओढले गेले. प्रभात फेरी झेंडा वंदन, स्वदेशिचा प्रसार, दारुबंदिचा प्रचार आदि कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडत होते.प्रत्येक जण देशभक्तिने प्रेरित होउन, चळवळीत सामिल होत होता. त्यात नथूसिंह परदेशी ,देवराम कुकावलकर, भगवान शेंडे,कन्हेंया वाणी, डॉ मनोहर वडाळकर, रामदास शंकपाळ, दामोदर शाह यासारखी मात्तबर मंडली व् अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. कांग्रेस अधिवेशनाना उपस्थित राहणे महात्मा गाँधीच्या सभा ऐकावयास जाने तेथून पत्रके आनने व ती वाटणे अशी कामे ही होत होती. काही कार्यकर्ते भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीत मदत करत होते पत्रके वाटने निरोप सांगायला जाने आदि कामे होत होती. भूमिगत कार्य करनार्याँन मध्ये गोरख हुलाजी महाजन, छगन तंबोली, भगवंत बैकर, गुलाबसिंह परदेशी, सुपडु बनकर, दगडुसा कलाल, आदि कार्यकरत्यांचा समावेश होता. प्रत्यक्ष मदत करनार्यान मध्ये काशी नाथ भाट, बबन चौधरी, रामदास गुजराथी, चंदू वना, सुपडु बनकर, पी एस वाणी, एस बी शिंपी, गिम्बा पाडवी, छोटुभाई वाणी, मदन पाटिल, गिरधर लोहार, लक्ष्मन पाटिल, इंदास पाटिल, शंकर कलाल, तुकाराम कलाल, तेजिबाई तंबोळी, आदि कार्यकर्त्यांचा समावेश होता. सामाजिक सुधारन्याच्या दिशेने आदिवासी समाजात जागृति घडविन्याचे काम मोरवड चे गुलाम महाराज करित होते. दारू पीऊ नये खोटे बोलू नये स्वच्छ ता राखणे मांस खाऊ नये एकमेकांचा आदर राखने आदि उपदेश त्यानी समाजाला केले तसेच पश्चिम खान्देश भिल्ल मंडळाची स्थापना झाल्या नंतर या मंडळा कडून देखील दारू बंदी शिक्षणाचा प्रसार आदि कार्यातुन मदत होत होती. 9 सप्टेम्बर 1942 रोजी नंदुरबार येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकिवर बेछट गोळीबार केल्याच्या निषेधार्थ तालुक्यात कडकडीत बंद पाळन्यात आला. शिरिशकुमार व त्याचे साथीदार या गोळी बारात शहीद झाले होते. 1944 च्या 21ऑगस्टला तळोद्यात पीपल्स एजुकेशन सोसाइटी ची स्थापना करण्यात आली. त्या वेळी नगर पालीकेकड़े असणारे शेठ के डी हायस्कूल चालवन्यासाठी घेतले व् तालुक्यात शिक्षणीक विकासाची मुहुर्तमेढ़ रोवली गेली. तलोद्यात हल्ली जेथे आनंद मेडिकल चौक आहे त्या चौकात गोलाकार ओटा व मध्यभागी एक स्तंभ होता . या जागेला रास खाब म्हणत असत स्वातंत्र्य संग्रामा च्या काळात सर्व राजकीय सभा सत्याग्रह याच ठिकाणी होत असत. अनेक कार्यकरत्यानी या स्तभावर झेंडा फड़कवून व् भाषणे करूण स्वतः ला अटक करून घेतली होती. त्याच बरोबर गिल्डर चौक कनकेश्वर मंदिर बलभीम व्यायाम शाला बालाजी वाडा विशालाल पंचवाडी ही ठिकाणे कार्यकर्त्यांच्या स्वातंत्र्य संग्रमाची मूक साक्षीदार होती. त्यात या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नानासाहेब ठक्कर, साने गुरूजी, भाऊ साहेब रानडे, शंकर पांडू माळी, एस ऍम जोशी, डॉ मिरजे, व्यकट आन्ना रणधीर, यांचे वास्तव्य राहिले होते. सुधाकर मराठे 9595008844