सदस्य:Snehal Dhanaji Hujare/s2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कागल येथील गैबी पीर: सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान

कागल येथे गैबी पीरसाहेब यांची पवित्र व प्राचीन समाधी आहे. कागल प्रांताचा बंडखोर देसाई बहादुरखान याचा बीमोड केल्याबद्दल कागलकरांचे पूर्वज भानाजी उर्फ तुळोजी यांना कागल प्रांताची देसगत देण्यात आली. याच सुमारास तालीकोटच्या प्रसिद्ध लढाईत अजरामर झालेले वीर पहिले झुंजारराव उर्फ पीराजीराव जन्मास आले. हा आपला भाग्योदय गहिनीनाथाच्या कृपाप्रसादानेच झाला या श्रद्धेने तुळोजींनी गहिनीनाथ हेच आपले कुलदैवत मानून त्यांच्या पुण्यस्मरणार्थ वार्षिक महोत्सव सुरु केला. त्यानंतर कागल सिनियरचे संस्थापक इतिहासप्रसिद्ध पुरुष सखाराम यांनी इ.स. 1801 साली कागलची स्वतंत्र जहागीर संपादन केल्यापासून तर उत्सवास अधिक महत्त्व प्राप्त झाले. या उत्सवाची सुरुवात पुष्य नक्षत्रावर काढणी चढवल्यानंतर कार्तिक शु॥ पाडव्याच्या दिवशी होते. दुस-या दिवसापासून रोज रात्री एक गलेफ घातला जातो. पहिला तेल्याचा, दुसरा गावक-यांचा, तिसरा ज्यु. कागलकरांचा तर चौथा सि. कागलकरांचा असे चार गलेफ घालण्यात येतात. चौथ्या गलेफाला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. या उरुसाला हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोक मोठ्या श्रद्धेने हजर राहतात. या उरुसावेळी मोठी यात्रा भरते. हजरी सायिब म्हणजे दर्ग्यातील सिद्ध पुरुष. शाहू राजांवर त्यांची मर्जी होती. जगन्माता देवी अंबाबाईची देखील राजर्षी शाहूंवर मर्जी होती, तिच्या कृपेचा वरदहस्त त्यांना लाभला होता. शाहू राजांच्या ठायी असलेली श्रद्धाभावनासुद्धा काही ओव्यातून दिसते. या आशयाच्या काही ओव्या उपलब्द्ध आहेत. शाहू राजांच्या कार्यकर्तृत्वाला सर्वसामान्य स्त्रियांनी श्रद्धेची आणि भक्तिभावनेची जोड दिली आहे.