Jump to content

सदस्य:Shrutika.c.patil/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शाहीर रंगराव पाटील                                                                                   

शाहीर रंगराव धोंडिराम पाटीलयांचे मूळ गाव महे (ता. करवीर) आहे. सध्या त्यांचे वास्तव्य कोल्हापूरमध्ये आहे. त्यांचे शिक्षण बी.कॉम., जी.डी.सी.अॅंहड ए झाले आहे. शाहीर पाटील यांनी 1986 पासून शाहिरीला सुरुवात करुन भजन, सोंगी भजन, नाटक, शाहिरी असा प्रवास करत आजपर्यंत शाहिरीचे 3000 पेक्षा जास्त कार्यक्रम केले. त्यांना ह. भ. प. दिनकर दादा माननीय भोसले ( नाट्य दिग्दर्शक) , कै वाय.जी.भोसले (नाट्य व सिने दिग्दर्शक) तसेच मा. शाहीर शहाजी माळी, मा. शाहीर दादा पासलकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पुण्याचे युवा शाहीर पुरस्कार, शाहीर हिंगे युवा गौरव पुरस्कार, शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार मिळाले आहेत. पंढरपूरच्या संत गाडगेबाबा लोकशाहीर विभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच कोल्हापूरमधून शाहीर समशेर पुरस्कार, कोल्हापूर शाहीर भूषण पुरस्कार, शाहिरी लोककलावंत पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. शाहीर पाटील यांनी 2003 मध्ये ‘मराठी लाईट इंफ्रंट्री बटालियन, फैजाबाद ( अयोध्या) येथे भारतीय सैन्यदलासमोर सलग दहा दिवस मोफत पोवाडा सादरीकरण केले. तसेच रायगड येथे मा. उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रसंत प.पू. भैय्यू महाराज यांच्या उपस्थितीत पोवाडा सादरीकरण केले. दिल्ली येथे हिंदीतून भारताचे पंतप्रधान मा. मनमोहनसिंग, राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी कलाकेंद्र येथे पोवाड्याचे सादरीकरण केले. रंगराव पाटील यांनी असे अनेक उल्लेखनीय कार्यक्रम भारतभर सादर केले. ‘शिवशाही ते लोकशाही’, वीर शिवा काशीद, राष्ट्रसंत गाडगे महाराज, शिवराज्याभिषेक सोहळा या ऑडिओ सीडी प्रकाशित आहेत. तसेच स्वराज्य ते सुराज्य- मोदी सरकार ही सीडी. देखील प्रकाशित आहे. ‘मुद्रा भद्राय राजते’ हे त्यांचे महाराष्ट्रातील पहिले पोवाडा नाट्य आहे. तसेच त्यांनी ‘स्वराज्यधर्म’ हे दुसरे पोवाडा नाट्य तयार केले आहे.