सदस्य:Sarathi pratisthan

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नमस्कार ,           
   वाहन चालक बधुंनो ,मी एक वाहन चालक म्हणून कार्यरत आहे. माझ्या या वाहन चालक  सेवेत मला विविध अडचणींना तोंड द्यावे लागले, मला   अनेक  समस्यांना  सामोरे जावे लागले. तसेच   माझ्या सारख्या चालक बांधवांना येणाऱ्या  समस्या  पाहून मल नेहमी वाटायचे आपल्या समस्या , अडचणी याची कोणीतरी दखल घ्यावी. पण तसं झालं नाही किंब्बहुना कोणी दखल घेत असेलही ,   मी आणि माझे वाहन चालक मित्र परिवार एकत्र येऊन एक निर्णय घेतला कि, वाहन  चालक     वर्गाची केंद्रीय पातळीवर एक संघटना असावी, म्हणून मी आणि माझे वाहन चालक मित्र  सतत दोन - तीन वर्षे चालक वर्गाला या गोष्टीची कल्पना देत गेलो. व त्यातूनच संघटना असावी असा    निष्कर्ष पुढे आला. प्रत्येकाला हेच वाटायचे संघटना असायला हवी. मला भेटलेले मित्र (वाहन चालक) त्या निमित्ताने सतत संपर्कात राहत होते. व पुढे हेच आमच्या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून आधारस्तंभ बनले. कारण  त्यांच्या जिद्दीने,तळमळतेणे,व निच्छयाने आम्हाला प्रेरणा मिळाली व मी आणि आमचे चालक सहकारी हे करू शकतो याचीजाणीव झाली . आम्ही सर्व वाहनचालक बंधू एकत्र येऊन या कार्याची  सुरवात दिनांक :२६ जानेवारी २०१० रोजी सायंकाळी संघटना स्थापनेबाबत निर्णय घेतला.त्या बाबत   आम्ही वाहन चालक बंधूनी कार्यकारिणी  विषयी चर्चा विनिमय करून कार्यकारिणी समिती ठरविली                   
आम्ही संघटनारुपी एक रोपटे लावण्याचा छोटासा प्रयत्न  करत आहोत  त्याला  आपल्या सर्वांची मदत हवी आहे. कारण हयाच रोपट्याचे पुढे मोठे झाडात रुपांतर होऊन सर्वाना विना भेदभाव सावली आणि फळ देईल हे नक्कीच .आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे आपण सहकार्य कराल हि अशा आहे     

संघटनेविषयी :

महाराष्ट्रातील वाहन चालक वर्गात वर्तमान स्थितीत व भविष्यात येणाऱ्या प्रश्नांवर    मुलभूत समस्यांवर मार्ग काढण्यासाठी एखादी केंद्रीय  पातळीवर संघटना असावी या भावनेतून आम्ही  सतत महाराष्ट्र भर दौरे  करून विविध स्थरातील वाहन चालकांचे प्रश्न , समस्या व उकल याबाबत  संशोधन  केलं आणि त्यावर एकत्र येऊन त्या विषयी काही  संघटनेमार्फत काही उपाय / मार्गदर्शन /योजना  आखल्या. तसेच वाहन चालक यांच्या नोकरीतील अडचणी त्यांच्या सुरक्ष्याविषयी उपाय योजना .संघटनेचे  ध्येय व्यापक जनहिताचे व  राष्ट्रहिताचे  चनात्मक  कार्याचे, असून कुठल्याही सामाज्याविषयी, समूहाविषयी,व राजकीय  पक्ष्याविषयी  द्वेषमुलक  असणार नाही . संघटनेचा उद्देश बहु उद्देशीय आहे तरी प्रारंभिक प्रमुख  पाच  उद्देश पुढील प्रमाणे असणार आहे 
 वाहन चालक कल्याणकारी योजना :

1) .या योजनेमध्ये प्रामुख्याने वाहन चालक/ त्याच्या कुटुंबासाठी आरोग्य विषय उपाय योजना / मार्गदर्शन. 2 ).पिडीत वाहन चालक / कुटुंब यांस आर्थिक मदत / मार्गदर्शन

नोकरीसाहायक योजना / मार्गदर्शन

1) .संघटनेच्या सभासदांना संघटनेचे ओळखपत्र / शिफारीश पत्र / देणे. जे त्याला नोकरीसाठी उपुक्त ठरेल २). संघटनेच्या सर्व साधारण मेळाव्याला सभासद उपस्थित राहून नोकरी विषयीचे चर्चा सत्रातसहभागी झाल्यामुळे त्याला नोकरी साठी उपयोग होईलक).

 व्यावसायिक सहायक मार्गदर्शन / मदत 

. एखाद्या वाहन चालकाला सुशिक्षित बेरोजगार अंतर्गत शासकीय कर्ज योजना मार्फत वाहनखरेदी करून व्यवसाय करायचा आहे त्याल मार्गदर्शन / शासकीय योजनांची माहिती देणे ड). अपंग कल्याण 1) अपंग वाहन चालकास आर्थिक मदत / व्यावसायिक मार्गदर्शन २) अपंग वाहन चालक यास सायकल वाटप २) . अपंग वाहन चालक यास सायकल वाटप इ). शैक्षणिक दर्ज्या १) . वाहन चालकांचा सर्वांगीण विकास व्हावा या भावनेतून त्यांना विविध भाषा यांचे ज्ञान व्हावे म्हणून मराठी ,इग्रजी ,हिंदी यांचे क्लास यायोजित करणे २). व्यक्तिमत्व विकास या सारखे विना मूल्य संघटने मार्फत राबविणे या मुले आजच्या स्पर्धेच्या युगात वाहन चालक कुठेही कमी न पडता त्याचे अस्थित्व टिकून राहण्यास मदत होईल व्यक्तिगत विकास व्यसन मुक्ती सारखी शिबिरे राबविणे यात वाहन चालकाला व्यसनापासून परावृत्त करणे

सामाजिक  

गरजू हुशार विद्यार्थांना शालेयउपयोगी साहित्य वाटप रक्त दान शिबिरे आयोजित करणे, /सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, /उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी मिळावे या भावनेतून पाणपोई उभारणे ,/वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक शाखेच्या परवानगीने वाहतूक नियंत्रणास मदत करणे .

शाररीक तंदुरुस्त वाहन चालक ,

सुरक्षित प्रवास :वाहन चालकांसाठी व्यायामाचे महत्व / व्यायाम शाळा उभारणे ,/ योगासने वर्ग विनामूल्य घेणे ( मानसिक तन कमी करण्यासाठी )

आर्थिकवाहन चालकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत व्हावी म्हणून                     
पुरुष बचत गटाची स्थापना करणे .
सांस्कृतिक वाहन चालकांच्या आंतरिक कला गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, उदा :  नाट्य, काव्ये, लेखन,नकला, व्यकतृत्व ,जोग , या सारखे