सदस्य:Sanusaniya/S1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात आजकाल धन्यता मानली जाते हे आपले दुर्दैव आहे . ही वत्ती अनिर्बंधपणे वाढण्यात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा मोठा वाटा आहे . आपली संस्कृती आपल्याला अंतरमुख होण्यास शिकविते . मी स्वतः पाश्चात्य राष्ट्रांमद्ये  बरीच वर्षे वास्तव्य केले आणि मी स्वानुभवावरून अगदी ठामपणे सांगू शकतो कि आपल्या देशातील सर्वसाधारण माणसापेक्षा अधिक ज्ञान असते . आमच्या कुटुंबात आम्ही चेष्टेने म्हणायचो कि अमेरिकन माणसाला त्यांच्या नित्याच्या गोष्टींव्यतिरिक्त इतर काही माहिती नसते . तो तसा विचारच करू शकत नाही . तो तांत्रीक व्यवस्थेचा गुलाम आहे . शिकागो एरपोटावरील सगळीकडे गोधळ सुरु झाला . लोकांची पळापळ सुरु झाली आणि विमानतळावरील अधिकाऱ्यांना त्यांना कसे आवरावे किंवा मार्गदर्शन करावे हे सुचेना . हे कशामुळे झाले , तो बिघाड कोठे आहे हे शोधायला व तो दुरुस्त करायला त्यांना दोन दिवस लागले . हे आपल्या लोकांना आश्चर्य वाटण्यासारखे आहे . आपल्याकडे तर हे रोजचेच आहे . यांच्यासारखे आणखी एक उदाहरण म्हणजे अलिकडेच झालेला राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळचा मतमोजणीचा गोंधळ . प्रत्येकवेळी मशीन वेगळाच आकडा दाखवू लागली . मी एका अमेरिकन माणसाला मजेने सांगितले की त्यांची इच्छा असेल तर मी आमच्या देशातील मतमोजणीतला एखादा तज्न्य पाठवू शकणे . आपल्याकडील जे तरुण आपल्या स्वप्नपपूर्तीसाठी पश्चिमेकडे डोळे लावून बसले आहेत त्यांच्या डोक्यात थोडाफार प्रकाश पडावा या हेतूने मी हे प्रकार सांगितले आहेत . मला त्यांना असे सांगावेसे वाट्ते कि सकारात्मक विचार करून त्यांनी आपल्या क्षमतेचा पूर्ण व योग्य उपयोग केला तर आपलाच देश त्याचे उज्ज्वल भवितव्य घडवील .पी . ए . इनामदार हे यांचे उत्तम उद्दाहरण आहे .

लेखक पुणे विद्यापीठाचे व्हाइस चॅन्सेलर आहेत .