सदस्य:Santoshsthakur

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पांगरी ता.नांदेड

पांगरी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यात तसेच नांदेड तालुक्यात येते

पांगरी हे गाव तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 361वर आहे विष्णूपुरीपासून दक्षिणेस 2 किमी अंतरावर आहे

पांगरी या गावचे पोस्ट विष्णूपुरी आहे पिंनकोड 431606

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प - कै शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पाचा मुख्य कालवा पांगरी या गावात पूर्वेकडील भागातून जातो

तसेच उत्तर दिशेला साठवन तलाव आहे

तसेंच पूर्व दिशेला एक छोटासा माळ आहे

पांगरी गावात महादेवाचे मंदिर आहे, सदर मंदिराचे 10 वर्षापूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे,तसेच गावात हनुमान मंदिर,दत्तात्रय मंदिर,वैष्णवी देवी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर,महाकाली मंदिर आहे

गावामध्ये एप्रिल महिन्यात महादेवाची यात्रा भरते,सदर देवस्थान शिखर शिंगणापूरचे लहान पीठ मानले जाते, गावातील कोणत्याही व्यक्तीने शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन घेतले नाही

शैक्षणिक माहिती: सदर गावाच्या शिवारा मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा बराचसा भाग येतो

श्री गुरुदत्त प्रतिष्ठान नांदेड द्वारा संचलित नांदेड रुरल डेंटल व फिजिओथेरपी कॉलेज अँड रिसर्च सेंटर,पांगरी

संत गाडगेबाबा हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे

गावाच्या दक्षिणेकडील शिवारालागत लोहा तालुक्याची सुरुवात आहे

गावाच्या पूर्वेस असलेल्या माळाच्या पायथ्याशी नांदेड पोलीस दलातील एकमेव गोळीबार प्रशिक्षण केंद्र आहे

पांगरी या गावाची पंचायत 7 सदस्या ची आहे

2011 च्या जणगणने नुसार गावची लोकसंख्या 1261 असून त्यात 648 पुरुष,613 स्त्री आहेत,तसेच 0-6 वयोगटातील लोकसंख्या 166 आहे

प्रति हजारी स्त्री पुरुष प्रमाण 946 इतके आहे

साक्षरता: 81.46% असून स्त्री साक्षरता 72.98% तसेच पुरुष साक्षरता 89.50% इतकी आहे

गावातील बहुतांश जमीन ही विद्यापीठ व पाटबंधारे प्रकल्पा करीता संपादित केल्यामुळे सध्या गावात शेतीयुक्त जमीन अतिशय कमी आहे गावातील शेतकरी हे प्रामुख्याने सोयाबीन,गहू,ज्वारी,कापूस ही पिके घेतात मुख्य व्यवसाय शेती असला तरी दुग्ध व्यवसाय मोठ्याप्रमाणात चालतो

गावातील रहदारीसाठी राज्य परिवहन महामंडळाची शहर बस गावात येते तसेच रिक्षा,दुचाकी वाहनाचा वापर होतो