सदस्य:Sanjeevvelankar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • आज धृपद-धमार गायकीतील डागर घराण्याचे उस्ताद सईदुद्दीन डागर यांचा वाढदिवस.*

जन्म. २० एप्रिल १९३९ हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणा-या धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणा-यांमध्ये उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफलीचे राजाच असतात. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आलेला आहे. आता तो त्यांचे दोन्ही सुपुत्र उस्ताद नफिसुद्दीन डागर आणि उस्ताद अनिसुद्दीन डागर तसेच शिष्य पुढे नेत आहेत. डागर साहेबांचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम संपन्न झाले असून धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे त्यांच कौशल्य थक्क करणारे आहे. संगीतातील विद्वता प्रत्यक्ष मैफिलीमध्ये अभिव्यक्त करणा-या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे. उस्ताद सईदुद्दीन डागर यांना मिळालेल्या पुरस्कारांची मालिकाही मोठी आहे. देशविदेशात त्यांचा शिष्यसंप्रदाय आहे. याशिवाय त्यांनी अनेक शिष्यांनाही या कठीण गायकीच्या क्षेत्रात तयार केले आहे. उस्ताद सईदुद्दीन डागर यांना बालगंधर्व पुरस्कार मिळला आहे. संगीतातील विद्वता प्रत्यक्ष मैफिलीमध्ये अभिव्यक्त करणा-या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे.

  • संजीव वेलणकर पुणे.*