सदस्य:Sandip mangal ashok wadikar/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हुपरीचा चांदी व्यवसाय

हुपरी म्हटले की नजरेसमोर येतात ते नखशीखांत चांदीची कलाकूसर असणारे चांदीचे दागिने. अतिशय सुंदर , सुबक आणि नाजूक अशा पध्दतीची चांदीचे दागिने हुपरीत बनविले जाता. हुपरी हे तसे आडवळणी गाव या गावाला यायचे म्हणजे ठरवूनच यावे लागते. आर्थीक सुबत्ता आणि घरोघरी सुरू असणारा चांदीचा व्यवसाय हीच ओळख या हुपरीची आहे. सौंदर्यदृष्टीने पारंगत असणारी माणसं या हुपरी नगरीत दिसतात. कला रसिकाला भुरळ पाडणार्‍या या चांदी व्यवसायाचा आणि हुपरीचा सहसंबंध कसा आला हे पाहताना या व्यवसायाचा पूर्वइतिहास जाणून घेतला पाहिजे. सुमारे १०० ते १२५ वर्षापूर्वीची पूर्वपरंपरा हुपरीच्या चांदी व्यवसायाला आहे. येथील सोनार कुटूंबीय शेतसारावसूल करण्याच्या कामाबरोबरच नाण्यांच्या खर्‍या खोट्याच्या तपासणीचे काम करत होते. त्यामध्ये केशव आणि कृष्णा हे दोघे कुशल आणि कसबी कारागीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची मूल दादू केशव पोतदार आणि वामन कृष्णाजी पोतदार यांनी खर्‍या अर्थाने हुपरीला चांदी व्यवसाय मिळवून दिला. या दोघांना चांदीव्यवसायाचे आद्य प्रवर्तक मानले जाते. हुपरीच्या चांदीव्यवसायाचे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणचा सर्व व्यवहार हा तोंडी आणि विश्वासावर चालतो. कारखानदार कारागीरांना चांदी कोणत्याही कागदपत्राशिवाय देतो आणि तो कारागीरही दिलेल्या चांदीच्या एक एक ग्रॅम पर्यंतचा हिशोब देतो. असा लाखोंचा तोंडी व्यवहार कदाचितच कुठेतरी अस्त्तित्वातअसेल.चांदीचा एक दागिना तयार करण्यासाठी जवळ जवळ पंचवीस ते तीस टप्प्यामध्ये चांदीवर प्रक्रिया करावी लागते. एवढ्या प्रक्रियातून आपल्या समोर नाजूक, सुबक, नक्षीकाम केलेला चांदीचा दागिना तयार होतो. हुपरीच्या बाजारपेठेत पैंजनाचे अनेक प्रकार पहायला मिळतात. तसेच तोडेवाळे, हातातील कडे, स्प्रिंग वाळे, बॉल तोरडी, गुणमाला, रुपाली, कमरपट्टे, करदोडे, साखळी बदाम, घुंगरु, गजश्री, मासोळी, जोडवी, वाक्या, घागरी, चाळ ,छल्ले या सारखे नानाविध दागिने हुपरीत बनविले जातात.हुपरीच्या पेठेत तयार झालेला माल भारतभर विकला जातो. याला फिरतीला जाणे असे म्हटले जाते. या ठिकाणी तयार होणारा माल इथला व्यापारी परराज्यातील पेठेत जावून देतो आणि त्याबदल्यात रोख रकमेच्या ऐवजी कच्ची चांदी घेतली जाते.या व्यवसायाची पुढील प्रमाणे विभागणी करता येईल, १)कच्ची चांदी ते दागिन्यांची निर्मिती आणि तयार माल देशभरातील बाजारपेठेत पुरवठा करणारा उद्योजक. २)चांदीचे दागिने घेवून देशभराच्या बाजारपेठेत पाठविणारा व्यापारी. ३)धडी उत्पादक : कच्च्या चांदीचे दागिने तयार करणारा. ४)कारागीर ५)गलई काम करणारा. हुपरीची चांदी आजच्या घडीला भारतभर प्रसिद्ध आहे. अशी स्त्री दुर्मिळच जिणे हुपरीची चांदी वापरली नसेल. आत्ता हा व्यवसाय तरूण आणि इंटरनेटचा आपल्या व्यवसायासाठी वापर करणार्‍या तरुणाईच्या हातात आलेला आहे. त्यांनी या व्यवसायाचे स्वरूपच बदलून टाकलेले दिसते. http://www.gjsci.org/newsletter/August2018.pdf