Jump to content

सदस्य:Sakheesu

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव भारती सुरेखा आहे. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र येथे लिंगभाव,संस्कृती,आणि विकास या विषयात डिप्लोमा केला आहे . विद्यापीठातील आवडते विभाग :क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र,राज्यशास्र विभाग या दोनही विभागातील सगळे शिक्षक खूप आवडते आहे

राज्यशास्त्र विषयात एम . फिल केले असून माझा संशोधनाचा विषय पर्वती मंदिर सत्याग्रह १९२९:एक राजकीय अभ्यास असा आहे . अस्पृश्यता निवारण्यासाठी महाराष्ट्रातील दलित नेत्यांबरोबरच काही सवर्णातील नेतेही सहभागी होते. ज्या पुणे शहराला धर्म ,संस्कृती व विद्येचे माहेरघर समजले जाते त्याच शहरात मात्र मंदिर प्रवेशाला विरोध होतो . पुण्यामध्ये अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिता यावे यासाठी पुन्हा -पुन्हा प्रयत्न करावे लागले. अस्पृश्यानिवारणासाठी या सत्याग्रहात मुख्यत : पाडुरंग नाथुजी राजभोज ,न. वि. गाडगीळ ,शिवराम जानबा कांबळे,लोखंडे इ . कार्यकर्ते सहभागी होते