सदस्य:Sakhare mahi

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोलापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे.शहराला संपन्न असा वारसा लाभलेला आहे.सोलापुरातील इंग्रजी कालातील लष्करी कायदा प्रसिध्य आहे.या शहराला प्राचीन, मध्य युगीन, इतिहास लाभलेला आहे.शहर चादरीसाठी प्रसि ध्य आहे.किल्ला,दवाखाने येथे आहे.वेगवेगळ्या बोली भाषेसाठी सोलापूर प्रसिध्य आहे.कडक भाकर व शेंगा चटणी साठी सोलापूर प्रसिद्ध आहे.दयानंद शिक्षण संस्था ही सोलापुरातील अग्रनी शिक्षण संस्था आहे.तिची स्थापना इ.स.1940 मध्ये झाली. संस्थचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.सोलापूर हे उत्तर भारत व दक्षिण भारताला जोडणारा मुख्य दुवा आहे.शहरातील सिद्धेश्वर मंदिर व जुने सिद्धेश्वर मंदिर हे भाविकांच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यात ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची जत्रा भरते. त्या जत्रेस गड्डा जत्रा असे संबोधिले जाते.सामाजिक,आर्थिक, राजकीय,संस्कृती क दृष्टया सोलापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे.सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक औद्यीगिक शहर आहे.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, माचनूर, मार्डी इत्यादी तीर्थक्षेत्रे राज्यात प्रसिद्ध आहे.त्याच प्रमाणे सोलापूरच्या सीमेवर वसलेले तुळजापूर, गाणगापूर ही महत्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. सोलापूर शहरात प्रामुख्याने मराठी, तेलुगू , कन्नड, उर्दू, हिंदी इत्यादी भाषा बोलल्या जातात.त्यामुळे सोलापूर हे महाराष्ट्रातील एक बहुभाषिक शहर आहे.सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यास ज्वारीचे कोठार असे संबोधले जाते.सोलापूर जिल्हा हा डाळिंबाच्या तसेच द्राक्षाच्या उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे.सोलापूर शहरातील कापड गिरण्याची सुरुवात इ.स.१८७२ पासून झालेली असून जुनी मिल, नरसिंग गिरजी मिल इ. शहरातील प्रसिद्ध कापड गिरण्या आहेत.दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस 'हुतात्मा दिन' म्हणून सोलापूर शहरात साजरा केला जातो. कारण याच दिवशी जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, किसन सारडा या चौघांना पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली गेली होती.सोलापूर शहरातील नवी पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, अशोक चौक, बेगम पेठ इ.परिसर व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीस आलेला आहे.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूर शहराचा समावेश केला गेला आहे.यानुसार सोलापूर शहरात निरनिराळी विकास कार्ये सुरू करण्यात आलेली आहे.सोलापूर शहर हे सद्य स्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख मेडिकल हब म्हणून नावारूपास आलेले आहे.कर्नाटक,तेलंगणा या परिसरातून लोक उपचारासाठी मोठ्या संख्याने सोलापुरात येतात.