सदस्य:Sachin Kaple

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कामिनी रॉय...

बंगाली कवयित्रि, सामाजिक कार्यकर्त्या कामिनी रॉय यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल साकारून त्यांना आदरांजली वाहिली आहे. कामिनी रॉय यांचा जन्म १२ ऑक्टोबर 1864 साली तत्कालीन बंगालच्या बाकेरगंज जिल्ह्यात (आता हा भाग बांगलादेशात आहे) झाला. कामिनी रॉय यांची आज १५५ वी जयंती आहे. महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला होता.

महिलांच्या मतांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या महिलांमध्ये कामिनी रॉय यांचं नाव अग्रक्रमावर आहे. संभ्रांत कुटुंबात जन्मलेल्या कामिनी रॉय यांचे भाऊ कोलकाताचे महापौर होते. तसेच त्यांची एक बहीण नेपाळच्या शाही कुटुंबात फिजिशियन म्हणून नोकरीला होत्या. महिलांना मतांचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता. त्याकाळी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कुप्रथा होती. कामिनी रॉय यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती. परंतु, पुढे त्यांनी संस्कृत या विषयात आपले शिक्षण पूर्ण केले. कोलकाता येथील बेथुन महाविद्यालयात त्यांनी आपले [[१]] साली बीएची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयात शिकवायला सुरुवात केली.

कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची अबला बोस या विद्यार्थिनीसोबत ओळख झाली. अबला या महिला शिक्षण आणि विधवा महिलांच्या कल्याणासाठी काम करत होत्या. त्यांच्या कामांवर प्रभावित होऊन कामिनी रॉय यांनी आपले आयुष्य महिलांच्या अधिकारासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

इल्बर्ट विधेयका

कामिनी रॉय यांनी इल्बर्ट विधेयकालाही पाठिंबा दिला. व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात म्हणजेच [[२]] साली इल्बर्ट विधेयक आणले होते. या विधेयकामुळे भारतीय न्यायाधीशांना युरोपीय नागरिकसंबंधी प्रकरणावर सुनावणी करण्याचा अधिकार मिळाला. याचा युरोपिय समुदायाने विरोध केला होता , परंतु भारतीय लोकांनी याला पाठिंबा म्हणून आंदोलन सुरू केले. त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले.

१९०९ साली पती केदारनाथ रॉय यांच्या निधनानंतर कामिनी यांनी महिला समितीसोबत काम करणे सुरू केले. महिलांच्या हक्कासाठी त्यांनी स्वतःला संपूर्णपणे समाजकार्यात झोकून दिले. कामिनी रॉय यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले. तसेच तत्कालीन बंगालमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढली. अखेर [[३]] साली झालेल्या निवडणुकीत महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला. [[४]] साली त्यांचे निधन झाले.