सदस्य:SIMRANK21
वैयक्तिक माहिती | |
---|---|
Full name | राही जीवन सरनोबत |
Citizenship | भारतीय |
जन्म |
३० ऑक्टोबर १९९० कोल्हापूर, महाराष्ट्र |
राही सरनोबत
[संपादन]राही जीवन सरनोबत ही २५ मीटर नेमबाजी / पिस्टल शूटिंगची एक भारतीय खेळाडू आहे. आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ती २०१३ आणि २०१९ मध्ये, म्हणजेच दोन वेळा चॅम्पियन ठरली आहे. २०१९ मध्ये तिने आयएसएसएफ विश्वचषक जिंकून टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले. (4) तिने आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकेही जिंकली आहेत.
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
[संपादन]राहीचा जन्म ३० ऑक्टोबर १९९० रोजी महाराष्ट्राच्या कोल्हापुरात झाला. शाळेत असतानाच तिची एनसीसी प्रशिक्षणात शस्त्रास्त्रांशी ओळख झाली. लहानपणापासूनच तिने बंदूक चालवण्यात चांगले कौशल्य दाखविले. [1]
राहीच्याच शाळेतील यशस्विनी सावंत हिने २००६ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकले होते. तिच्यापासून प्रेरित होऊन राहीनेही नेमबाजी करण्याचा निर्णय घेतला. राही सांगते की पहिल्यांदा पिस्तूल उचलून तिचा उत्साह खूप वाढला, आणि तेव्हा तिला नेमबाजी हेच आयुष्याचे ध्येय असल्याचे लक्षात आले. [1]
क्रीडा क्षेत्रात सुरुवातीच्या काळात राहीला तिच्या गावी कोल्हापुरात पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्यामुळे त्रास झाला. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिला आवश्यक तो पाठिंबा दिला. त्यानंतर तिने चांगल्या सुविधा असलेल्या मुंबईत जाऊन प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. [1]
व्यावसायिक यश
[संपादन]२००८ मध्ये पुण्यातील युवा राष्ट्रकुल खेळांमध्ये राही सरनोबतने २५ मीटर नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. (1) तिच्या कारकिर्दीतला आणखी एक महत्त्वाचा क्षण तेव्हा आला जेव्हा तिने फोर्ट बेनिंगमध्ये झालेल्या २०११च्या आयएसएसएफ विश्वचषकात कांस्य पदक जिंकले. (4) त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते, आणि ती 19व्या क्रमांकावर आली. तिने ती निराशा बाजूला ठेवत आणखी कसून सराव सुरू ठेवला. (1) तिच्या प्रयत्नांना यश आले जेव्हा २०१३ मध्ये दक्षिण कोरियाच्या चांगवॉन येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात तिने सुवर्णपदक जिंकले. (2)
मात्र २०१५ मध्ये झालेल्या अपघातामुळे तिच्या कोपराला दुखापत झाली, ज्यामुळे तिला तब्बल दोन वर्षे बरे होण्यासाठी लागली. हा तिच्यासाठी एक मोठा धक्का होता. (2) त्यानंतर तिने भारतीय संघात पुनरागमन केले आणि जर्मन प्रशिक्षक मुंखबायार दोर्जसुरेन यांच्याबरोबर सरावास सुरवात केली. त्यांनी राहीला शारीरिक तसंच आणि मानसिक कणखरता मिळविण्यास मदत केली. (2) गंमतीची गोष्ट म्हणजे २०१२ ऑलिम्पिकमध्ये दोर्जसुरेन हे राहीचे प्रतिस्पर्धी होते. (3)
त्यानंतर, राहीने २०१८मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. कुठल्याही आशियाई खेळांमध्ये नेमबाजीत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
२०१८ मध्ये नेमबाजीमधील तिच्या कामगिरीबद्दल तिला भारताच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. (5)
पुढच्याच वर्षी तिने जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्ण पदकाला पुन्हा गवसणी घातली. या विजयामुळे तिचे टोकियो ऑलिम्पिकमध्येही स्थान पक्के झाले. आता तिचे लक्ष्य भारतासाठी तिथे सुवर्ण पदक जिंकणे आहे. (1)
संदर्भ
[संपादन]1. https://www.bbc.com/marathi/india-55800138 [1]
2. https://www.olympicchannel.com/en/athletes/detail/rahi-sarnobat/
3. https://www.dnaindia.com/sports/interview-this-shुट-star-rahi-sarnobat-has-an-olympic-dream-2791291
4. https ://indianexpress.com/article/sport/sport-others/munich-world-cup-rahi-sarnobats-journey-takes-her-to-tokyo-olympic-games-5751386/
5. https://www.republicworld.com/sports-news/other-sports/never-ever-dreamt-of-this-award-rahi-sarnobat-silences-her-critics-with-an-arjuna.htm
उजवीकडील बाजूस माहिती
[संपादन]पूर्ण नाव: राही जीवन सरनोबत
जन्म: ३० ऑक्टोबर १९९०
जन्मस्थान: कोल्हापूर, महाराष्ट्र.
खेळ: २५ मीटर नेमबाजी
प्रतिनिधी: भारत
पदके
[संपादन]भारतीय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनेक सुवर्ण पदके
युथ कॉमनवेल्थ गेम्स पुणे २००८ मध्ये सुवर्ण पदक
सुवर्ण पदक आशियाई खेळ २०१८
सुवर्ण पदक आयएसएसएफ विश्वचषक २०१३ दक्षिण कोरिया
जर्मनी २०१९ मधील सुवर्ण पदक आयएसएसएफ विश्वचषक