सदस्य:Ramesh Tambe

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रमेश तांबे
This file represents profile image of my wikipedia page.
जन्म नाव रमेश पांडुरंग तांबे
जन्म ४ जुलै १९६५
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र मराठी लेखक
साहित्य प्रकार बालसाहित्य


श्री. रमेश तांबे हे मराठी भाषेतील कवी, लेखक असून बालसाहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. आतापर्यंत त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातली सात पुस्तके बालविश्वाशी निगडित आहेत. स्वप्न, खिडकी, नवलनगरी,पी.टी.चा तास आणि इंद्रधनु हे पाच बालकविता संग्रह आणि धमाल गोष्टी —बालकथा,रंजक मराठी..शब्द वाक्प्रचारांच्या शोधकथा ही पुस्तके प्रकाशित आहे. त्यांना आज पर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून त्यात अकोला, बुलडाणा, पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमधील अनेक नामवंत साहित्यमंडळांचा वा ग्रंथालयांचा समावेश आहे.या शिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारांनी दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. २०११ सालात प्रकाशित झालेल्या त्यांच्या पहिल्याच स्वप्न या बालकविता संग्रहाला कविवर्य भा.रा. तांबे. राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर २०१७ सालात प्रकाशित झालेल्या त्यांच्या धमाल गोष्टी या बालकथा संग्रहाला राजा मंगळवेढेकर राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रकाशित पुस्तके[संपादन]

 • स्वप्न : (बालकाव्य संग्रह - २०११)

बालकाव्य संग्रह

 • खिडकी : (बालकाव्य संग्रह - २०१३)

बालकाव्य संग्रह

 • प्रतिबिंब : (काव्यसंग्रह - २०१३)

काव्यसंग्रह

 • नवलनगरी : (बालकाव्य संग्रह - २०१५)

बालकाव्य संग्रह

 • वर्तुळ : (लघुकथासंग्रह - २०१५)

लघुकथासंग्रह

 • पी.टी.चा तास : (बालकाव्य संग्रह - २०१७)

बालकाव्य संग्रह

 • धमाल गोष्टी : (बालकथा संग्रह - २०१७)

बालकथा संग्रह

 • इंद्रधनु : (बालकाव्य संग्रह - २०१९)

बालकाव्य संग्रह

 • रंजक मराठी : (शब्द - वाक्प्रचाराच्या शोधकथा - २०१९)

वाक्प्रचाराच्या शोधकथा

चिनूचे स्वप्न....बाल-कुमार कादंबरी (२०२१)

पुरस्कार[संपादन]

 • महाराष्ट्र शासनाचा बालवाङ्मयाचा कविवर्य भा.रा.तांबे पुरस्कार २०११(स्वप्न)
 • महाराष्ट्र शासनाचा बालवाङ्मयाचा राजा मंगळवेढेकर पुरस्कार २०१८(धमाल गोष्टी)
 • शशिकलाताई आगाशे बालसाहित्य पुरस्कार (बुलढाणा)
 • अंकुर बालसाहित्य पुरस्कार - (अकोला)
 • साहित्य दरवळ मंच बालसाहित्य पुरस्कार -(मुंबई)
 • लळित बालसाहित्य पुरस्कार - (पुणे)
 • प्रा.चंद्रकांत नलगे सार्वजनिक ग्रंथालय बालसाहित्य पुरस्कार - (कोल्हापूर)
 • श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर बालसाहित्य पुरस्कार - (आजरा/कोल्हापूर)
 • महाराष्ट्र साहित्य परिषद - उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार - (पुणे)
 • बालरंजन साहित्य मंच - उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार - (कोल्हापूर)
 • बालरंजन साहित्य मंच - उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (पी टी चा तास)- (कोल्हापूर)
 • मराठी बालकुमार साहित्य सभा - उत्कृष्ट बालकथा (धमाल गोष्टी)-(कोल्हापूर)
 • साहित्य विहार संस्था नागपूर--उत्कृष्ट मराठी कुमार साहित्य पुरस्कार( रंजक मराठी...वाक्प्रचार..शब्दांच्या शोधकथा)

२०२०(नागपूर)

रमेश तांबे यांची साहित्यिक कामगिरी[संपादन]

श्री. रमेश तांबे हे मराठी भाषेतील कवी, लेखक असून बालसाहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम या तेलशुद्धिकरण कंपनीत ते कार्यरत असले तरी मराठी साहित्य निर्मितीमध्ये त्यांची सतत धडपड सुरू असते. आतापर्यंत त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातली सात पुस्तके बालविश्वाशी निगडित आहेत. स्वप्न, खिडकी, नवलनगरी, पी.टी.चा तास आणि इंद्रधनु हे पाच बालकविता संग्रह आणि धमाल गोष्टी — बालकथा संग्रह,रंजक मराठी— शब्द—वाक्प्रचारांच्या शोधकथा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याच बरोबर प्रतिबिंब हा कवितासंग्रह आणि वर्तुळ हा लघुकथासंग्रह प्रकाशित करून त्यांनी मोठ्या साहित्य वर्तुळातदेखील चंचू प्रवेश केला आहे. याच बरोबर बालकादंबरी, बालनाट्य, पत्रलेखन, मराठी भाषा व्याकरण या सारख्या अनेक प्रांतात त्यांची मुशाफिरी सुरू आहे. मनोरंजनातून प्रबोधन हेच सूत्र त्यांच्या बालसाहित्याच्या निर्मिती मागे असल्याचे सतत जाणवते.

रमेश तांबे आणि सामाजिक संस्था[संपादन]

रमेश तांबे हे अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत. त्यात प्रामुख्याने अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला या मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेत ते गेली २० वर्ष कार्यरत आहेत. त्याच बरोबर अमर हिंद मंडळ दादर मुंबई, बालविकास मंदिर दादर मुंबई येथे सदस्य आहेत.त्याच प्रमाणे ते सल्लागार असलेल्या ध्यास प्रतिष्ठान वसई वाडा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वसई वाडा या तालुक्यातील २०—२५ शाळांना दरवर्षी मदत दिली जाते. तसेच रमेश तांबे हे महाराष्ट्रभर विविध शाळांतून मुलांसाठी कथाकथनाचे आणि कवितांचे कार्यक्रम सादर करतात. आजपर्यंत जवळपास २०० शाळांना त्यांनी भेट दिली आहे.

सामाजिक संस्था[संपादन]

 • साने गुरुजी कथामाला वरळीगाव मुंबई - कार्याध्याक्ष
 • अमर हिंद मंडळ दादर - सदस्य
 • बालविकास मंदिर दादर - सदस्य
 • ध्यास प्रतिष्ठान - सल्लागार(वसई वाडा)
 • विविध शाळांमधुन कविता वाचन - कथाकथनाचे कार्यक्रम

विशेष उपलब्धी[संपादन]

 • राष्ट्रीय अंध शाळा,मुंबई तर्फे 'स्वप्न' या पुस्तकाची ऑडिओ सीडीची निर्मिती.
 • गोवा शासनातर्फे ग्रंथ खरेदी योजनेत 'स्वप्न': या बालकविता संग्रहाची निवड.
 • महाराष्ट्र शासनातर्फे ग्रंथ खरेदी योजनेत 'प्रतिबिंब': या कवितासंग्रहाची निवड.
 • ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित वक्ता म्हणून सहभाग.
 • गोवा शासनातर्फे ग्रंथ खरेदी योजनेत 'नवलनगरी': या बालकविता संग्रहाची निवड.