सदस्य:Rajashree Vasant Chougule/s1
म्हाकवे
कागल पासून अवघ्या २० किलोमीटर वर असलेले, कर्नाटकने घेरलेलं ,वेदगंगा नदीकाठी वसलेलं असं हे म्हाकवे गावं. श्री सिद्धेश्वर देवालय हे मुख्य मंदिर जे कि हृदयाच्या स्थानी असल्यासारखे गावाच्या मध्य भागी आहे. ५,१३० लोकसंख्या असलेले हे गाव आहे. गावामध्ये जाण्यासाठी आप्पाचीवाडी, कुर्ली, भाटनांगनूर ,आनुर, गोरंबे, हदनाळ असे मार्ग आहेत. गावच्या स्टॅण्डवर पूर्वीपासूनच चिंचेचं आणि पिंपळाच झाड आहे तसेच मरगाई-लक्ष्मीचं मंदिर आहे. शाळा 'विद्या मंदिर ,म्हाकवे ',आणि आजूबाजूला स्टेशनरी,मेडिकल्स,कापड दुकान ,किराणा दुकान आहेत. गावामध्ये सिद्धेश्वर मंदिर, मारुती मंदिर, गणेश मंदिर, मरगाई-लक्ष्मी मंदिर, हालसिद्धनाथ मंदिर, ग्रामदैवत गावडुबाई आणि नृसिहं मंदिर इ. आहेत. गावची नदी दक्षिण भागातून जाते. विद्या मंदिर म्हाकवे, म्हाकवे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज म्हाकवे, सदाविजय माध्यमिक विद्यालय म्हाकवे या गावातील शाळा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ,के. डि .सी. सी. बँक,गणेश पत संस्था अश्या संस्था आहेत. गणेश दूध संकलन केंद्र हे गावातील मुख्य त्याबरोबर सैनिक दूध संकलन केंद्र हेदेखील दूध संकलन केंद्र आहे. सरकारी दवाखाना मारुती मंदिरमध्ये तसेच इतरत्र काही ठिकाणी आहे. महाशिवरात्रीमध्ये हालसिद्धनाथ मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाशिवरात्री मोठ्या आनंदात साजरी केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आनंदाने साजरे केले जातात. झाँजपथक आणि लेझीम हे पारंपरिक खेळ सुरुवातीपासून जोपासले आहेत. झाँजपथक आणि लेझीम हे खेळ तर दिल्लीपर्यंत पोचवले आहेत. दरवर्षी गावातील तरुण मंडळे गणेश विसर्जनानिमित्त झाँजपथक आणि लेझीम खेळण्यासाठी दिल्लीला जातात.हि कला लहानांपासून वृद्धांपर्यंत जोपासली आहे. गावचे गृहस्थ अगदी आनंदाने सहभागी होतात. तर हालसिद्धनाथ आणि सिद्धेश्वर देवालयमध्ये वालंग हा पारंपरिक ढोलवाद्य प्रकार खूप लोकप्रिय आहे. मकर संक्रांतीला ५ दिवस सत्संग व्याख्यानमाला असते तर वेगवेगळ्या निमित्ताने विविध योजना आयोजित केल्या जातात, जसे कि रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर स्वच्छता अभियान यामध्ये गावातील सर्व तरुण मंडळे सहभागी होतात. विजयमाला सदाशिवराव मंडलिक हे गावातील वाचनालय असून येथे मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तके, वृत्तपत्रं ,कादंबऱ्या, ग्रंथ,साप्ताहिके,लेख,अभ्यासाची पुस्तके उपलब्ध आहेत. आठवडी बाजार हा रविवारी भरत असून स्थानिक तसेच आजूबाजूची आप्पाचीवाडी, कुर्ली, भाटनांगनूर ,आनुर, गोरंबे, हदनाळ, कागल येथून लोकं येतात. आठवडी बाजार जोरात होतो. स्थानिक तसेच बाहेरील व्यापाऱ्यांना मोट फायदा होतो. रविवारी बाजार भरतो तरीही दररोज स्टॅण्डवर ताजी भाजी मिळते. वैभव फर्निचर आणि पल्लवी फर्निचर हे गावातील होलसेल फर्निचरची दुकान आहेत. शेतकरी सेवा औषधं केंद्र हे गावातील पूर्ववत चालत आलेलं औषधं दुकान आहे. कापड दुकानं, दवाखाना, मेडिकल्स, किराणामाल दुकान, भांडी दुकान, सर्विसिंग सेंटर यांची कमी नाही. ग्रामपंचायत हि गावच्या मध्यभागी स्थिरावली आहे. जनजीवन खूप सुखी आहे. पाण्यासाठी नदी तर आहेच त्याशिवाय सार्वजनिक तलाव आणि स्वतःच्या विहिरी आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Mhakave