सदस्य:Rahul Dhanorkar/धूपा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री क्षेत्र कारंजा लाड[संपादन]

श्री वासुदेवानंदसरस्वती व श्री ब्रह्मानंदसरस्वतीस्वामी यांच्या प्रयत्नाने श्रीगुरूंच्या या जन्मस्थानाची महती सर्व दत्तभक्तांना पटलेली दिसते.करंजमुनींनी या ठिकाणी पाण्यासाठी तलाव खणण्यास सुरुवात केल्याची कथा आहे. या क्षेत्रात गंगा व यमुना यांचे वास्तव्य बिंदुमती नावाच्या कुंडात असून येथून पुढे बेंबळा नदी वाहते.दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी वा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे.याच करंजनगरीत श्री नृसिंहसरस्वती शके १३००च्या सुमारास जन्मास आले.गुरुमंदिरातील मूर्ती अतिशय रम्य व बालसंन्यासी रुपातली आहे. येथेही श्री नृसिंहसरस्वतींचा वा दत्तात्रेयांचा साक्षात्कार अनेकदा साधकांना झालेला आहे.मंदिर बांधण्यास प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम पायाशुद्धी करण्यात आली. त्याकरिता नाशिकचे रहिवासी श्री. अण्णाशास्त्री वारे व श्रीधरशास्त्री आणि काशीचे दोन विद्वान ब्राह्मण यांना पाचारण करून शास्त्रोक्त विधिपूर्वक काही ताम्रपट मंदिराच्या पायामध्ये ठेवण्यात आले. शके १८५५ मार्गशीर्ष महिन्यात मंदिराची कोनशिला बसविण्यात आली. दिनांक ३ डिसेंबर १९३३ ह्या दिवशी श्री दत्तजयंतीच्या सुमुहूर्तावर मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. मुंबईवरून स्थापत्यशास्त्रनिपुण श्री. आचरेकर यांना बोलाविण्यात आले होते. केवळ चार महिन्यात (चैत्र १८५६ या महिन्यात) मंदिराचे काम पूर्ण झाले. मंदिराकरता लागणारे दरवाजे, खिडक्या, संगमरवरी दगड इत्यादी सामान मुंबईहून आणण्यात आले होते.जन्मस्थान हे काही कारणामुळे बऱ्याच कालपर्यंत अज्ञात राहिल्यामुळे ज्या ठिकाणी श्रींनी जन्म घेतला व आपल्या दैवी बालक्रीडा केल्या ते कारंजा गाव इतके दिवस अप्रसिद्ध राहिले. परंतु प्रभुकृपेने श्रींच्या जन्मस्थानाचा, म्हणजेच कारंजा गावाचा पूर्ण पत्ता लागल्यामुळे आज त्या ठिकाणी श्रींचे मंदिर बांधण्यात येऊन त्यात श्रींच्या मूर्तीची व निर्गुण पादुकांची स्थापना करण्यात आली आहे .[१]

  1. ^ http://www.dattamaharaj.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE. १६ /०१ /२० १९ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)