सदस्य:Prithvilyerge

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदेड जिल्यातील देगलूर तालुक्यात लेंडी नदीच्या तीरावर आचेगाव हे गाव वसलेले आहे. देगलूर च्या पश्चिम दिशेला आचेगाव आहे. गावामध्ये पश्चिम दिशेला एक पाण्याची टाकी आहे. आचेगावची लोकसंख्या 1100 आहे. मतदान 800 आहे. पश्चिम दिशेला गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे . येथे 4 थी पर्यन्त शिक्षण दिले जाते. विद्यार्थी संख्या 35 आहे. लेंडी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. उत्तर दिशेला गावामध्ये ग्रामपंचायत आहे यात 7 सदस्या चा समावेश आहे. गावामध्ये एकूण 350 घरे आहे येथील लोकसंख्या 1100 व मतदार संख्या 800 आहे गावामध्ये एकूण शेती 600 एकर आहे. शेती मध्ये रब्बी आणि खरीब पिके आहेत. येथील जमीन कोरडवाहू आहे. येथे टाळकी,कापूस,मूग,उडीद,तूर, मिरची हि पिके घेतली जातात गावामध्ये दोन सार्वजनिक बोर आहेत. पूर्व दिशेला महादेवाचे व मारोती मंदिर आहे. या गावांमध्ये लिंगायत,धनगर,मराठा,मुस्लिम,मातंग,गोसावी,जंगम,हरिजन या जातीचे लोक येथे राहतात. 31/10/1986 ला महापूर आला होता व दुसऱ्या गावाची निर्मिती झाली.