सदस्य:Pooja Madan Patil

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                   कोहिमाची लढाई दुसर्‍या महायुद्धादरम्यान जपानी सैन्य, आझाद हिंद फौज व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये लढली गेली होती. एप्रिल ४ ते जून २२, इ.स. १९४४ दरम्यान आधुनिक भारताच्या नागालँड राज्यातील कोहिमा शहराच्या सीमेवर लढली गेलेली ही लढाई जपानच्या उ गो मोहिमेचा सर्वोच्चबिंदू होता. या लढाईची तुलना अनेकदा स्टालिनग्राडच्या वेढ्याशी करण्यात येते.
                   तीन टप्प्यांत लढल्या गेलेल्या या लढाईच्या सुरुवातीस एप्रिलच्या पूर्वार्धात जपानने कोहिमा रिज ही जागा जिंकून इंफाळकडे जाणारा रस्ता ताब्यात घेतला. १६-एप्रिल १८च्या दरम्यान ब्रिटिश व भारतीय सैन्यांची कुमक आडवाटेने कोहिमाला पोचली व त्यांनी जपान्यांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या प्रतिहल्ल्यानंतर जपानी सैन्याने कोहिमा रिज सोडली पण कोहिमा-इंफाळ रस्ता त्यांच्याच ताब्यात राहिला. मेच्या मध्यापासून जून २२ पर्यंत ब्रिटिश आणि भारतीय सैन्याने हळूहळू माघार घेणार्‍या जपानी सैन्याला मागे रेटत रस्ता काबीज केला. तिकडून इंफाळकडूनही चालून आलेल्या दोस्त सैन्याशी त्यांनी मैल दगड १०९ येथे संधान बांधले व इंफाळला पडलेला वेढा मोडून काढला.