सदस्य:PoojaSunil/कार्बन मार्केट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्बन बाजार १९९७ साली क्योटो परिषद झाली. युनायटेड नेशन्सच्या संयुक्त देशांनी या वेळी एकत्र येऊन करार केला. जागतिक हवामान बदल आणि त्यामुळे होणारी जागतिक तपमान वाढ ही मानव निर्मित‍ आहे. हरितगृह परिणामामुळे ही तपमान वाढ होत आहे. यासाठी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे हेच मुख्य गरजेचे आहे. परंतू कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे म्हणजे आर्थिक प्रगती रोखणे. विकसनशील देशांत ऊर्जेसाठी तंत्रज्ञान व आर्थिक सहाय्य देऊन आपले उत्सर्जन करण्याच्या पर्यायामुळे कार्बन बाजार सुरु झाला.

कार्बन बाजार म्हणजे उत्सर्जनाचा व्यापार. (उत्सर्जनाची खरेदी आणि विक्री हा बाजारपेठेचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन करणाऱ्या प्रदूषकांना आर्थिक रुपाने प्रोत्साहन दिले जाते.)

कार्बन उत्सर्जनाची खरेदी आणि विक्री:- कार्बन उत्सर्जनाचा व्यापार म्हणजे एक प्रकारची बाजारपेठ जिथे मुख्यत्वे करून कार्बनडायऑक्साईडला लक्ष्य केले जाते (कार्बन डायऑक्साईड टनांत मोजला जातो किंवा tCO2) आणि सद्य परिस्थितीत यातील मुख्य घटक उत्सर्जनाची खरेदी आणि विक्री हाच आहे. देश या प्रकारच्या व्यापाराच्या परवान्याची(परवाना वापरण्याची) पध्दत ही सर्वसामान्यपणे क्यूटोच्या कराराच्या मूळ मसुद्याच्या बंधनाची पूर्तता करण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ जसे कार्बन उत्सर्जन कमी करून भविष्यातील तपमान बदल कमी करणे.

कार्बन खरेदी विक्रीच्या व्यापारात देश किंवा प्र दूषक जो जास्त प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन करतो त्याला जास्त उत्सर्जन करण्याचा अधिकार आणि देश ज्यांच्याकडे कमी उत्सर्जन आहे , त्यांचा उत्सर्जनाचा अधिकार हा इतर देशांना विकू शकतो. अशाने प्रदूषण करणार्‍यां देशांना जास्त प्रमाणात उत्सर्जन करून आपली स्वत:ची कार्बन उत्सर्जनाची गरज भागवू शकतात. आणि परिणामी सर्वांत पहिल्यांदा या कार्बन कमी करणाऱ्या पद्धतीचा सर्वांत जास्त वापर केला गेला.


संदर्भ

https://en.wikipedia.org/wiki/carbon_emission_trading