सदस्य:NAGNATH GURAV

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
औषधी वनस्पती: कडुलिंब/कडूनिंब 
 

कडुलिंब/कडूनिंब:

     इंग्रजी नाव: NEEM 
     आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणारा वृक्ष म्हणजे कडुलिंब होय. हा वृक्षसुद्धा हिंदू धर्मात महत्वाचा मानला जातो.

वर्णन:

कडुलिंबाच झाड
    कडुलिंबचे झाड मोठे असते.हे झाड सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते.याचे खोड सरळ वाढते;नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची अ लांबट असतात.पानाच्या कडेने नक्षी असते.एका काडीला दहा ते बारा पाने येतात.पानाचा देठ बारीक असतो. चव कडवट असते.या झाडाची फुले लहान,पांढरया रंगाची तसेच सुगंधी असतात.या झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात.त्या फळाचा आकार लहान असतो.त्यात बी असते.त्याला लीबोळी असे म्हणतात.

धार्मिक महत्व:

  मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडव्याला होते.त्या दिवशी गुडी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. 
  तसेच त्या झाडाच्य फुलांची मिरपूड,मीठ,गुळ घालून केलेली चटणी खावी,अशी प्रथा आहे.

औषधी महत्व:

   कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने,काड्या वाटून,त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी 
   तल्लख गीते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवर कडूलिंबाची 
   पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण 
   कडूलिंबाचा वापर करतात. 

इतर माहिती:

    कडूलिंबची झाडे जिते जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून,त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.