सदस्य:Muskaan Mushtak Shaikh/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
           हल्ली संपूर्ण जगात शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने वाढ होत आहे.  भारतासारख्या १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी बऱ्याच तरतुदी केली तरच प्रत्येकाला  शिक्षणाची संधी मिळू शकते. जो पर्यंत शासन शिक्षणाच्या माध्यमाने नागरिकांच्या चांगल्या विकासासाठी योग्य सोयी उपलब्ध करून देत नाही, माझ्या मते, तो पर्यंत देशाचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही. देशात सध्या ६० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शासकीय संस्थांबरोबरच ज्या खासगी संस्था समकालीन ज्ञानाचे कार्य करीत आहेत. त्यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे आहे. 
           वसंदादा पाटील केवळ चौथीपर्यंत शिकलेले होते. पान दूरदृष्टी व वैचारिक परिपक्वतेचा जोरावर ते केवळ पुढारीच झाले नाही तर शैक्षणिक बाबतीत ते एक तज्ज्ञ म्हणून गणले गेले. त्यांनीच खासगी संस्थांना मेडिसिन, इंजिनिअरिंग व लॉ इत्यादी विभागात संस्था स्थापन्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या प्रयत्नामुळेचअत्याधुनिक शिक्षण देणाऱ्या खासगी संस्थांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. या सोयीनमुळेच केवळ आपल्या देशादेशातील विद्यार्थीच महाराष्ट्रकडे आकर्षित होतात असे नाही तर जगातील इतर देशातूनही विध्यार्थी मोठ्या प्रमाणात येत आहेत. अश्या या खासगी संस्थांना त्यांच्या कार्यात मांद्य येणार नाही किंवा ते अडचणीत येणार नाहीत हे पाहणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांना सर्व प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध  करून द्यायला हवेत. त्याच प्रमाणे समाजाचे व राष्ट्राचे हित लक्षात घेऊन त्यांच्या महत्वाच्या गोष्टींमध्ये महत्वाचे निर्णय घेऊ देण्याचे स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवे. श्री पि . ए. इनामदारांचे शैक्षणिक यश यातच आहे कि अत्युत्कृष्ट शैक्षणिक संस्था तर काढल्याचं शिवाय ते कोणताही निर्णय कोणताही भेदभाव ना करता समाजाचे व देशाचे हित होईल अशा पद्धतीने घेतात. .