सदस्य:Mrunali pilankar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द्युतीचंद[संपादन]

द्युती चंद (जन्म:  ३ फेब्रुवारी १९९६) ही एक भारतीय धावपटू आहे.  जागतिक १०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय आहे.  सद्यस्थितीत १०० मीटर स्पर्धेमधील  उत्कृष्ट धावपटू म्हणून राष्ट्रीय  स्तरावर तिला ओळखले जाते.  [2]

बालपण  आणि पार्श्वभूमी[संपादन]

द्युती चंद हिचा जन्म ओडिशा जाजपुर जिल्ह्यातील चाका गोपाळपूर गावात एका  विणकर कुटुंबात झाला. सात भावंडांमध्ये द्युती  हे तिसरे अपत्य होती.  लहानपणापासून तिला धावण्याची आवड आवड आहे. कुटुंबाच्या  हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे द्युती चंद आणि तिची मोठी बहीण सरस्वती चंद या दोघी २००६ साली एका शासकीय क्रीडा वसतिगृहात दाखल झाल्या. [3]

कारकीर्द[संपादन]

द्युती चंद हिने २०१२ मध्ये १८ वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये १००मीटर स्पर्धेत नवीन विक्रम प्रस्थापित करत विजेतेपद पटकावले. [7]


पुढील वर्षांमध्ये म्हणजेच २०१३ मध्ये पुणे येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने २०० मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. त्याशिवाय राष्ट्रीय वरिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये १०० आणि २०० मीटर स्पर्धांची तिने जेतेपदे पटकावली. [8] त्याच वर्षीच्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाल्यानंतर ती जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय धावपटू ठरली.


तायपेई येथे झालेल्या आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने २०० मीटर आणि ४×४०० रिले स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके मिळवली.

खेळाडू म्हणून स्थगिती[संपादन]

हायपरएड्रोजेनिझ्ममुळे अर्थात शरीरात जास्त प्रमाणात टेस्टोस्टिरोन आढळल्यामुळे अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) तिच्यावर राष्ट्रकुल खेळांपूर्वी बंदी आणली. [5] [8 आंतरराष्ट्रीय क्रीडा न्यायलयाने (CAS) तिच्या याचिकेवरील सुनावणी करताना आयएएएफचे नियम नाकारले, आणि २०१५ मध्ये  तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली.

न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतरचे यश[संपादन]

द्युती चंदने यानंतर अधिक चांगली कामगिरी करत २०१६ मध्ये दोहा येथील एशियन इंडोर अॅथलेटिक्स स्पर्धेत ६०मीटर प्रकारात नवीन राष्ट्रीय विक्रमसह कांस्य पदक जिंकले. यानंतर कझाकिस्तानमधील जी कोसानोव्ह स्मरणार्थ स्पर्धेत तिने १००मीटरचं अंतर ११.२४ सेकंदात पूर्ण करत २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले.

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग[संपादन]

१९८० मध्ये मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पी. टी. उषा यांनी सहभाग घेतला होता त्यानंतर ही संधी चंद हिला मिळाली.

रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक  स्पर्धांमध्ये  द्युटी सहभागी   झाली   परंतु प्राथमिक फेरींच्या पुढे  तिला यश मिळू शकले नाही.

●      द्युतीने २०१८ मध्ये जकार्ता येथील आशियाई स्पर्धांमध्ये दोन रौप्य पदके पटकावली. तिचे १००मीटरमधले रौप्य पदक हे भारतासाठी एशियाडमधील दोन दशकात पहिलेच होते.  यापूर्वी १९८६ च्या  स्पर्धेत जेव्हा पी. टी. उषाने दुसरे स्थान मिळविले होते. द्युती चंदने तीन दिवसानंतर २००मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकून पदकांची जोडी पूर्ण केली.

●     २०१८मध्ये झालेल्या जकार्ता येथील तिच्या पहिल्याच आशियाई खेळांमध्ये १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतींमध्ये तिने रौप्य पदक मिळवले. [1]

●     २०१९ मध्ये नेपोली येथे झालेल्या उन्हाळी युनिव्हर्सियाड स्पर्धेत १००मीटर शर्यतीत ती अव्वल स्थानी आली. कुठल्याही जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पयनशिपमध्ये १००मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली. [1]

●     ५९व्या राष्ट्रीय ओपन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत ११.२२ सेकंद ही वेळ नोंदवत चंदने स्वतःचा विक्रम मोडला. [9]

विशेष पुरस्कार[संपादन]

व्यावसायिक  करार

ऑगस्ट 2019 मध्ये प्रख्यात स्पोर्टवेअर ब्रँड पुमाने त्यांच्या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी द्युती चंदसोबत दोन वर्षाचा करार केला.

अन्य

Mrunali pilankar
वैयक्तिक माहिती
Full name द्युती चंद
Citizenship भारतीय
जन्म ३ फेब्रुवारी १९९६
जाजपुर, ओडिशा, भारत
Sport
खेळ ट्रॅक अँड फील्ड

२०१६ मध्ये ओडिशा राज्य सरकारच्या ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशनमध्ये (OMC) तिची सहाय्यक व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली. [4]