सदस्य:Maziaai3694

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाकोडी: एक गाव

नाव जरी वळणाच असलं तरी हे गाव मात्र वाकड वगैरे नाही. गाव मोठ्ठं आणि भरपूर लोकसंख्या असलेलं. किंबहुना सर्वच जाती धर्माची लोक या गावात अगदी आनंदाने एकत्र राहतात.

या गावाला जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. पुसद -उमरखेड रोड गौळ या गावारुन मोरथ- वाकोडी असा तर पुसद- महागाव या रोडवरुन सवना गावापासून ३ कि.मी. हा दुसरा मार्ग. पुस नदीच्या तीरावर आणि शेतीच्या कुशीत वसलेलं हे गाव.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांती प्रणेते श्री. वसंतराव नाईक यांच्या पुसद तालुक्यापासुन ३० ते ३५ कि. मी. अंतरावर असलेलं आणि महागाव तालुक्यात वसलेलं हे गाव.

वाकोडी हे तसं सिद्धेश्वर या महादेवाच्या देवस्थानासाठीही प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतील जवळ-जवळ सर्वच गावं ईथे दर्शनासाठी हजेरी लावतात.

मिळत असलेल्या मुबलक पाण्यामुळे इथे उस, सोयाबीन, कापुस, तुर, मुग, हरभरा, ज्वारी आणि गहू यासारखी अनेक पिके इथले कष्टाळू शेतकरी आपल्या शेतात घेतात.