सदस्य:Mahesh Ahilyaram lagad

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतकं_सोप्पं_नसतं

अवकाशाच्या निर्वात पोकळीत भिरकावून देतो तो सारे प्रश्न,चिंता दरवेळी, पण विवंचनेचा वेताळ पुन्हा पुन्हा येऊन बसतो त्याच्या पाठगुळी...

तो मातीत मिसळतो स्वतःला, ओव्हरटाईममध्ये डोळे फोडून घेतो, गुरामागं हिंडतो रानोमाळं, किंवा गल्लीतल्या चौकात काढत असतो पंक्चर...

पाखरांच्या पंखावरली नक्षी तो रेखाटतो स्वतःच्या रक्तानं.. घर कोमेजू नये अभावाच्या ऊन्हात, म्हणून भिजत राहतो खारट पाण्यात.

तो कुलदैवत पुजतो, उंबरे झिजवतो.. लेक उजवतो... जोडून ठेवतो नाळ गणागोताशी.. हवं ते पुढ्यात टाकून न्याहाळतो पिलांच्या डोळ्यांतली चमक..

जीर्ण स्लीपरची गुंडी पुन्हा पुन्हा लावत.. ओढत राहतो खपाट बैलागत संसार नावाची अवजड मोट.. सावलीचा पदर वितळत जाताना उसवतो ब-याचदा आतल्या आत

आलेले उमाळ्याचे कढ पापण्यात गोठवण्याचं कसबं कोण्या देवाजीनं त्याच्या पदरात असेल घातलं? बाप नावाच्या धरणाच्या भिंतीत कोणतं सिमेंट असेल ओतलं?

अंगणात नाचणारे मोर दूर उडून जातात रानात, कधी न परतण्यासाठी...

हे ठाऊक असूनही धरणीगत तो भेगाळत राहतो, आशेची पालवं जखमांवर बांधून आयुष्याच्या पाट्यावर स्वतःलाच उगाळत राहतो..

खरच बाप होणं इतकं सोप्पं नसतं...!!!!!!!

                  पुनीत मातकर, यवतमाळ,महाराष्ट्र