सदस्य:Madhyandin Brahman Wadi

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माध्यंदिन ब्राह्मण वाडी (उत्तर कोकणस्थ शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मणांची)


माध्यंदिन ब्राह्मण वाडी ह्या संस्थेची स्थापना १९३६ रोजी झाली. ही संस्था उत्तर कोकणस्थ शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मणांच्या मालकीची आहे. त्यावेळेच्या मान्यवर व्यक्तींनी म्हणजे  

डॉ. कृष्णाजी गणपत नाईक (अध्यक्ष), दि.ब.बाबासाहेब उर्फ प्रद्माकर भास्कर शिंगणे , डॉ. नीळकंठ अनंत पुरंदरे, वे.शा.सं.भास्कर जनार्दन शास्त्री, डॉ. मोरेश्वर चिंतामण जावळे , डॉ. यज्ञेश्वर वि. पुरंदरे, श्री. केशवराव आ. पाध्ये. या सर्वांनी पुढाकार घेऊन त्यावेळी एक इमारत फंड कमिटी ची स्थापना केली. त्याचे श्री. आनंदराव गोपीनाथ जोशी व श्री. पुरुषोत्तम वि.मोगरे हे संयुक्त चिटणीस म्हणून काम पाहत होते. ह्या कमिटी ने १९३३ साली एक विनंती पत्रक काढून पैसा फंड गोळा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर समाजात फिरुन ३ वर्षांत त्यांनी रु.३६०००/- जमविले . त्या फंडातून रु. ३३०००/- खर्च करून सध्या साई धाम वाडीच्या जवळ असलेली माध्यंदिन ब्राह्मण वाडी अस्तित्वात आली.

काळानुसार ह्या संस्थेच्या समाजातील मंगल कार्यालायास अधिक जागा करून देण्यासाठी माध्यंदिन ब्राह्मण सभेच्या सुवर्णमहोत्सवाच्या वेळी या वाडीचा विस्तार करण्याचा विचार विश्वस्त मंडळानी करून मंगलकार्या बरोबर एक नाट्यगृह असावे असे ठरवून त्यावेळी माननीय श्री. दि. ब. बाबासाहेब शिंगणे ह्यांनी आपल्या वाडीच्या इमारतीला लागून असलेली त्यांची स्वत:ची रिकामी जागा व एक बंगला देणगी रूपाने समाजास देऊन आपल्या वाडीचा विस्तार करण्यास उदार अंतकरणाने मदत केली. त्यासाठी फंड गोळा करण्यासाठी काही योजना आखून तो जमा केला व आपली एक भव्य अशी वास्तू मुंबई येथील गिरगांव भागात उभी केली गेली. त्याचवेळी ०९/०८/१९६४ रोजी रावबहाद्दूर हरिश्चंद्र कृष्ण जोशी ट्रस्टच्या विश्वस्तांनी विलीनीकरणासंबंधीचा ठराव वाडीच्या विश्वस्तांकडे पाठविला व २१ /०८/१९६४ रोजी झालेल्या सभेत त्याला मान्यता मिळाली. त्यामुळे रा. ब. हरिश्चंद्र कृष्ण जोशी ट्रस्टचा ऐवज आणि बाबुलनाथ येथिल धर्मशाळा माध्यंदिन ब्राह्मण वाडीकडे आली. विलीनीकरण होऊन माध्यंदिन ब्राह्मण वाडी ही संस्था १९६५ साली भव्य रूपाने समाजाच्या घटकास, मंगलकार्य तसेच इतर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करण्यास उपलब्ध करून देण्यात आली.

    १९७० नंतर वाढत्या महागाईमुळे वाडीची इमारत सुस्थितीत ठेवण्यास विश्वस्त मंडळास त्रास होऊ लागला. त्यानंतर १९९० सालापासून ते १९९८ सालापर्यंत वाडीची इमारत अक्षरशः मोडकळीस आलेली. तिची दुरुस्ती विश्वस्त मंडळाच्या आवाक्याबाहेर होती. त्यावेळी अशा वाईट परिस्थितीत समाजातील घटकांनी वाडीच्या प्रेमापोटी सढळ हाताने देणग्या दिल्या तसेच बिनव्याजी ठेवी ठेवल्या व वाडीची वास्तू नव्याने उभी केली. 
    नोव्हेंबर २०१५ मध्ये पुन्हा एकदा ह्या वास्तूचे नूतनीकरण करण्यात आले. आज आपली वाडी एका नविन रुपात आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. वाडीच्या पहिल्या मजल्यावरील शिंगणे सभागृह वातानुकूलित करण्यात आला आहे.