सदस्य:Kamble Vidhin * sangola *

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                                                                                                                                                                  पक्ष्यांचे घरटे

सामान्यपणे आपण चिमणी, कावळ्याची घरटी नेहमी पहात असतो. चिमणीचे घरटे घराच्या वळचणीला बांधलेली असतात. मोठमोठ्या काटक्यांचा वापर करून कावळा आपले घरटे उंच झाडावर करतो. अशाच प्रकारे असंख्य पक्षी घरटे बनवत असताना आपल्या आसपासच्या परिसरात दिसून येतात. पक्षी कुठेही घरटी बांधत नाहीत. अत्यंत काळजीने व सुरक्षित ठिकाणी ही घरटी बांधलेली असतात. जेणेकरून अंडी व पिलांना संरक्षण मिळाले पाहिजे. घरट्याची जागा निवडण्यासाठी पक्षी आपापसात भांडत असतात. परंतु एकदा भांडण मिटले कि ते घरटे बांधण्याच्या कामाला लागतात. टिटवी, सुरय इ. पक्षी घरटी बांधत नाहीत. हे पक्षी जमिनीवरच अंडी घालतात. अंड्यांचा रंग सभोवतालच्या वातावरणाशी मिळता-जुळता असतो त्यामुळे अंडी सहज सहजी ओळखता येत नाहीत. कोकीळ व पावश्या पक्षी घरटे बांधत नाहीत. कोकिळेची मादी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. तर पावश्या त्याच्याच कुळातील सातभाईच्या घरट्यात अंडी घालतात व पालकत्वाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकून मोकळे होतात. बहुतांश पक्षी अत्यंत परिश्रम घेवून घरटे बांधत असतात. विविध परिसंस्थामध्ये पक्षी कुठेही घरटे बांधताना आढळून येते. बहुतेक पक्षी झाडावर घरटे बनवत असतात. पक्ष्यांची घरटी झाडाच्या शेंड्यावर, खोडामध्ये, भिंतीत, जमिनीवर, छपरात, घरांच्या छतावर, मोकळ्या रानात, माळावर, कडेकपारीत, पानवनस्पतीवर, कुठेही पहावयास मिळतात. प्रत्येक पक्ष्यांच्या घरट्यांची रचना, आकार, व जागा ही पक्ष्यांच्या जीवनपद्धतीवर अवलंबून असते. काही पक्षी अत्यंत कुशल कारागीरासारखे आपले कौशल्य पणाला लावून सुंदर घरटी बनवतात. शिंपी हा चिमणीपेक्षा छोटासा हिरव्या रंगाचा व तपकिरी डोक्याचा पक्षी असून फार सुंदर घरटे बनवतो. शिंप्याचे घरटे जवळ-जवळ असणाऱ्या दोन पानांचा वापर करून आपल्या टोकदार चोचीने पाने शिवून बनवलेले असते. हे घरटे इतके बेमालूमपणे शिवलेले असते की अन्य पानामध्ये हे घरटे मिसळून जाते व सहजी ते आपल्या दृष्टीस पडत नाही. गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे वगैरे साहित्य वापरून हे घरटे तयार केलेले असते. सुगरण पक्ष्याचे घरटे अत्यंत सुंदर असते. एखाद्या उंच झाडावर अगदी टोकाला उलट्या बात्लीसारखी हि घरटी अत्यंत कुशल कारागीरासारखी गवताच्या कड्यापासून बनवलेली असतात. या घरट्याला खालून आत शिरण्यासाठी तोंड असते. पाणपक्षी आपले घरटे पाण्यावर तरंगणाऱ्या पानवनस्पतींच्या पानावर बनवतात. काही धोका जाणवल्यास हे पक्षी पाण्यात सूर मारतात. एवढ्यावरच ते थांबत नाहीत तर पाण्याखालून पानाचा देठ ओढतात. काही वेळासाठी घरटे पाण्याखाली लपवून ठेवतात. पाकोळी हा पक्षी आपले घरटे लाळेच्या सहायाने घराच्या छताला बनवत असतो. तांबट पक्षी झाडाला छिद्र पडून आपले घरटे बनवतो. खंड्याचा खंड्या पक्षी आपले घरटे म्हणजे जलाशयाच्या काठावर बिळ बनवलेले असते. हे बीळ ३ ते ८ फूट इतकी लांब असू शकतात. लांब असते. शेवटी मोठी पोकळ जागा तयार केली जाते. ज्यामध्ये मादी अंडी घालते पक्षांच्या घरट्याच्या आकारातही विविधता दिसून येते. मोठे पक्षी खूप मोठे घरटे बांधता. दक्षिण अमेरिकत एकदा टकल्या गरुडाचे प्रचंड घरटे आढळून आले. त्या घरट्याची खोली बारा फुट होती तर वजन तब्बल दोन हजार किलो होते ! याउलट हमिंग बर्ड हा जगातला सर्वात लहान पक्षी असून त्याचे घरटे फक्त एक इंचापर्यंत असते. अलीकडे बदलत्या परिस्थितीतीनुसार पक्षी घरटी बनवण्यासाठी अनैसर्गिक वस्तूंचा वापर करीत असलेले आपणास पहावयास मिळते. गवत-काड्याबरोबरच धातूच्या तारा, प्लास्टिक, कागद, रबराचे तुकडे, नळ्या इ वस्तूंचा समावेश असतो.


लेखक प्रा. डॉ. विधिन कांबळे प्राणीशास्त्र विभाग सांगोला महाविद्यालय सांगोला