सदस्य:KINGMAKER TUSHAR JADHAV
Appearance
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे .येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी आंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्ति पीठांपैकी एक आहे. पंचगंगा येथील प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा , गगनबावडा, नृसिहवाडी , खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध क्षेत्र आहे. कोल्हापूर ठिकाणी तांबडा आणि पांढरा रस्सा, मिसळपाव या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच, कोल्हापूरची 'कोल्हापुरी चप्पल' हि खूप प्रसिद्ध आहे त्याला कोल्हापुरी चप्पल असे म्हंटले जाते. आपुलकीची भावना हि इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हा प्रसिह खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे. तसेच बावडा मिसळ, फडतरे, चोरगे, हॉटेल साकोली अशी अनेक मसळपावची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. मिरजकर तिकटी, गंगावेश येथे दूध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दूध मिळते. हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासूर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. ये युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला.आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर हि नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. [श्री कार्व्हर निवासिनी ] ई .स .पूर्व १ ल्या शतकापासून ते ई. स. च्या ९ व्या शतकापर्यंतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रम्हपुरीच्या टेकडीवर होती. ब्रम्हपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्तखनन असे दर्शिवते कि, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून राहत होता. ई.स. २२५ ते ५५० पर्यंत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राज्यघराण्यांचे राज्य होते. ई.स. ५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. ई.स.च्या १२ व्य शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. ई.स. १२१० मध्ये देवगिरीचा राजा सिंघणदेव याने कोल्हापूराच्या शिलाहार सम्राट भोज राजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७ मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अम्मल सुरु झाला. कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते. देणगीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज्यांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ठ करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते . शिवाजी राजे नी अफजलखानाच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणी कोल्हापूर शिवाजी राजेंच्या राज्यात सामाविस्ट झाले. शिवाजी राजेंनी आणी संभाजी राजे यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार ठिकाण आहे. * त्यापैकी काही घटना ;-
१] सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायांना कोंडीत पकडले होते. २] शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने हि भूमी पावन झाली आहे. ३] कोंडोजी फर्जंद आणि आजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला. ४] दिलेरखानाच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजी महाराज आणि शिवरायांच्या भावपूर्ण भेट याच प्रदेशात झाली. ५] संभाजीराजास पकडणाऱ्या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली. ६] शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी या भूमीत घडला.
कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोने आहेत.