Jump to content

सदस्य:Jaykrishnanair

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकीपीडियाचा मुंबईतील तिसरा मेळावा

विकिपीडिया या संकेतस्थळावर सक्रिय सहभाग घेणा-यांचा मुंबईतला तिसरा मेळावा रविवारी (३१ ऑक्टोबर २०१०) सोफिया महाविद्यालयात होणार आहे. या मेळाव्यासाठी विकीपीडियाचे संस्थापक जिमी वॉल्स हेदेखील येणार आहेत.

विकिपीडियाचा वापर करून न थांबता तेथील मजकूर समृद्ध करणारे आणि विकीपीडियाच्या अन्य उपक्रमांतही सहभाग घेणारे (विकिपीडियन्स आणि विकिमीडियन्स) मुंबईत अनेकजण आहेत. पण यापूर्वीच्या दोन बैठका वांद्रे आणि खारघर येथे झाल्या, तेव्हा वांद्रय़ात २०, आणि खारघरला अवघे १० जण आले होते.

या भेटी दरम्यान चर्चा करण्यासाठी निश्चित असा कार्यक्रम ठरवलेला नाही. सहभागी होणा-यांनाही मतप्रदर्शनाची, व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे.

स्थळ- सोफिया महाविद्यालय, सोफिया भवन हॉल, भूलाभाई देसाई रोड, मुंबई. दिनांक आणि वेळ- ३१ ऑक्टोबर २०१०, सायंकाळी सहा वाजता.