सदस्य:Harrisw03/पॅटी ऑबरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅटी ऑबरी या कॅलिफोर्नियामधील अमेरिकन लेखिका आहेत. ‘चिकन सूप फॉर दि सोल’ या पुस्तक मालिकेच्या त्या सहलेखिका आहेत. या मालिकेमध्ये चिकन सूप फॉर दि ख्रिश्चन सोल याचाही समावेश होतो.

ऑबरी या महिला सक्षमीकरणाच्या प्रणेत्या आहेत. त्यांनी केवळ महिलांना उद्देशून असलेल्या ‘चिकन सूप फॉर दि ख्रिश्चन वुमेन्स सोल’ या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. आव्हानांचा सामना करणाऱ्या, कठीण प्रसंगांना सामोरे जाणाऱ्या आणि आशा पल्लवित करणाऱ्या महिलांच्या सत्य कथा या पुस्तकात मांडल्या आहेत.  फेथ (श्रद्धा), फॅमिली लव्ह (कुटुंब प्रेम), गॉड्स हीलिंग पॉवर (देवाची उपचारात्मक शक्ती), फ्रेंडशिप (मैत्री), मेकिंग अ डिफरन्स (बदल घडविणे), चालेंजेस अँड वंडर्स (आव्हाने आणि चमत्कार) हे त्यातील अध्याय आहेत. [१]

२०१५ साली दूरचित्रवाणीवरील ‘वेक’ या कार्यक्रमात त्या आल्या होत्या. २०१७ साली सोल ऑफ सक्सेस या चित्रपटातही त्या दिसल्या होत्या. स्व-मदत प्रकारातील त्यांच्या लेखनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. [२] [३] स्व-मदत, [४] [५] मन आणि शरीर [६] प्रशिक्षण, [७] जीवन संघर्ष, [८] पैसा, [९] यश, [५] आणि नावीन्य (इनोव्हेशन) [१०] या विभागातील अनेक पुस्तकांसाठी त्यांनी योगदान दिले आहे. लिझा निकोलस यांनी लिहिले आहे की ऑबरी या ‘संभाव्यतेची शक्ती’ आहेत. [८] स्वयं-लेखन पुस्तकांमध्ये त्यांची पुस्तके वाचनासाठी आवश्यक म्हणून गणली जातात. [११]

संदर्भग्रंथ[संपादन]

 

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Resources". Journal of Christian Nursing. 20 (2): 42–43. 2003. doi:10.1097/01.CNJ.0000262517.31611.06.
  2. ^ Brown, Pamela N. (1999). Facing Cancer Together: How to Help Your Friend Or Loved One (इंग्रजी भाषेत). ISBN 9780806638331.
  3. ^ Hansen, MV; Batten, J (2015). The master motivator: Secrets of inspiring leadership. Jaico Publishing House.
  4. ^ Misner, Ivan R. (March 24, 2012). "Business networking and sex : not what you think". Irvine, California: Entrepreneur Press – Internet Archive द्वारे.
  5. ^ a b Wright, Brian K. (20 March 2018). Success Profiles: Conversations With High Achievers Including Jack Canfield, Tom Ziglar, Loral Langemeier and More (इंग्रजी भाषेत). ISBN 9781683506164.
  6. ^ Sandella, Deborah (September 2016). Goodbye, Hurt & Pain: 7 Simple Steps for Health, Love, and Success (इंग्रजी भाषेत). ISBN 9781633410091.
  7. ^ Rajsekar, Siddharth. You Can Coach (इंग्रजी भाषेत).
  8. ^ a b Nichols, Lisa (6 May 2010). No Matter What!: 9 Steps to Living the Life You Love (इंग्रजी भाषेत). ISBN 9780748117529.
  9. ^ Honda, Ken (13 June 2019). Happy Money: The Japanese Art of Making Peace with Your Money (इंग्रजी भाषेत). ISBN 9781473684171.
  10. ^ McNealy, Megan (28 November 2019). Reinvent the Wheel: How Top Leaders Leverage Well-Being for Success (इंग्रजी भाषेत). ISBN 9781529374711.
  11. ^ Kelly, Mary Olsen (2002). Path of the Pearl (इंग्रजी भाषेत) (EasyRead Large Bold ed.). ISBN 9781442967199.