सदस्य:Harrisw03/तमोरा पियर्स
तमोरा पियर्स | |
---|---|
जन्म | १३ डिसेंबर, १९५४ |
साहित्य प्रकार | Children's and young adult fantasy |
पुरस्कार | साचा:Awd |
संकेतस्थळ |
tamora-pierce |
तमोरा पियर्स (जन्म 13 डिसेंबर 1954) या किशोरवयीन मुलांसाठी कल्पनारम्य कथा लिहिणाऱ्या अमेरिकन लेखिका आहेत. तरुण नायिकांच्या कथांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. पहिली पुस्तक मालिका, दि सॉन्ग ऑफ दि लायनेसमुळे (1983-1988) त्या प्रसिद्ध झाल्या. सैनिक म्हणून प्रशिक्षणाच्या चाचण्या देणारी आणि विजय मिळविणारी अॅलेना ही यातील मुख्य पात्र आहे.
पियर्स यांनी २०१३ मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशन अंतर्गत यंग अॅडल्ट लायब्ररी सर्व्हिसेस असोसिएशन (याल्सा) कडून दिला जाणारा मार्गारेट ए. एडवर्ड्स अवॉर्ड जिंकला. हा पुरस्कार त्यांच्या सॉन्ग ऑफ दि लायनेस आणि प्रोटेक्टर ऑफ दि स्मॉल (१९९९-२००२) या कामाची दखल यासाठी घेतली गेली."किशोरवयीन मुलांच्या साहित्यात अत्यंत महत्वपूर्ण आणि मोलाची भर घालणाऱ्या" लेखकाला आणि त्यांच्या विशिष्ट कार्याला दिला जाणारा हा वार्षिक अवॉर्ड आहे.
पियर्स यांची पुस्तके वीस भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. [१] [२] [३]
पियर्स यांचा जन्म 13 डिसेंबर 1954 रोजी दक्षिण कोनेल्सविले, पेनसिल्व्हानिया येथे फेएट काउंटीमध्ये झाला. आईला त्यांचं नाव "तमारा" ठेवायचं होतं. पण ज्या नर्सने जन्म दाखला भरला तिने "तमोरा" असे चुकीचे शब्दलेखन केले. [४] त्या पाच वर्षांच्या असताना बहीण किम्बर्लीचा ( हिच्यावर अॅलेना पात्र आधारित आहे) [५] जन्म झाला आणि त्यानंतर एका वर्षाने दुसरी बहीण मेलानीचा जन्म झाला. पाच ते आठ वर्षांच्या होईपर्यंत त्या डनबारमध्ये राहिल्या. जून 1963 मध्ये त्या कुटुंबासह कॅलिफोर्नियाला गेल्या. ते प्रथम एल कॅमिनो रिअलवरील सॅन माटेओ येथे राहिले आणि नंतर मिरामारमधील सॅन फ्रान्सिस्को द्वीपकल्पाच्या पलीकडे गेले. ते मिरामारमध्ये अर्धा वर्ष, एल ग्रॅनडामध्ये पूर्ण वर्ष आणि नंतर तीन वर्षे बर्लिंगममध्ये राहिले.
कार्य
[संपादन]हे देखील पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Search results for 'Tamora Pierce' > 'Book'". WorldCat.
- ^ "Pierce, Tamora". Index Translationum. UNESCO.
- ^ "Tamora Pierce". Goodreads.
- ^ Pierce, Tamora. "Tamora Pierce Biography". Tamora Pierce: Author of Young Adult Fantasy. Tamora Pierce. 5 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 October 2014 रोजी पाहिले.
- ^ Bonnie Kunzel & Susan Fichtelberg Tamora Pierce: A Student Companion, Hardcover, Greenwood Press, 2007
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- Works by or about Tamora Pierce (
- (ISFDB) Tamora Pierce
- Tamora Pierce
- प्रकाशक: ISFDB येथे सायन्स फिक्शन बुक क्लब (SFBC).
- प्रकाशक पृष्ठ
- गुडरीड्स
- ऍमेझॉन
- फेसबुक
- ट्विटर
- Tumblr
[[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १९५३ मधील जन्म]] [[वर्ग:Webarchive template wayback links]]