सदस्य:Gudmalwar kishan laxman

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामात धाडसी आंदोलनांसह हुतात्म्यांची ज्वलंत परंपरा निर्माण करणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 37 जण हुतात्मा झाले. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा ठरलेले गोविंदराव विनायकराव पानसरे होत. गोविंद विनायकराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे त्यावेळचे पूर्ण वेळ कार्यकर्ते व मुधोळ तालुक्याचे संघटक होते. पण, स्वातंत्र्य देवतेने वेढलेल्या गोविंदराव पानसरे यांचा 21 ऑक्टोबर 1946 रोजी मजलीस ए-इत्तेहादच्या रजाकारांकडून दिवसाढवळ्या खून करण्यात आला. त्याआधी पानसरे यांना एका आक्षेपार्य भाषणाप्रकरणी अटक झाली होती.

           जीवनभर विवाह आणि नोकरी न करता जनसेवा करण्याचे व्रत घेतलेल्या अशा गोविंद विनायकराव पानसरे यांचा जन्म इ.स 15 मे 1913 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील बदनापूर येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव विनायकराव आणि यमुनाबाई असे होते. पण, दुर्दैवाने अवघ्या सहा महिन्याच्या आत अशा अल्पावधीतच गोविंद रावाच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे गोविंदरावांचे मामा शंकरराव यांनी त्यांचे पालन पोषण व शिक्षणाची जबाबदारी घेतली. गोविंदराव यांचं मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हैदराबादच्या विवेक वर्धिनीत झाले. तर, नंतर इंटर साठी ते निजाम कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचे मामा शंकरराव यांची नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे स्टेशन मास्तर म्हणून बदली झाली होती व ते तिथेच स्थायिक झाले होते. गोविंदराव त्यांच्याकडे येऊन राहिले व सार्वजनिक काम करू लागले. हरिपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे अत्यंत बुद्धिमान, विचारी, विवेकी आणि चिकित्सक वृत्तीचे होते. त्याचबरोबर ते स्वाभिमानी, स्वावलंबी आणि प्रखर राष्ट्रभिमानी होते. त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व व संघटन कौशल्य होते. त्यांचा स्वभाव मोकळा, प्रेमळ पण करारी व निर्भीड होता ते महात्मा गांधीजींचे पक्के अनुयायी होते.

           वाचनालय, खादी भांडार व पुढे चालून महाराष्ट्र परिषद व स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून व्यापक स्वरूपाचे कार्य केले. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादच्या भोवती चार तालुक्यांच्या बहुतेक सर्व खेडोपाडी पायी दौरे करून काँग्रेसचे व खादीचे प्रचार, प्रसार कार्य त्यांनी केले. त्यामुळे ६००० प्राथमिक सभासद व ३०० खादीदारी त्यांचे अनुयायी बनले होते. गोविंदराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते व मुधोळ तालुक्याचे संघटक अशी महत्त्वाची जबाबदारी असल्याने या भागात गोविंदराव करत असलेले कार्य क्रूर रजाकारांना आवडणे शक्यच नव्हते. गोविंदरावांनी बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे रजाकारांच्या जुलमी राजवटी विरोधात केलेले भाषण सरकारला आक्षेपार्य वाटले. त्यामुळे त्यांना अटक झाली. जामीन मिळाला नाही. शेवटी 21 ऑक्टोबरला अचानकपणे जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. यामध्ये निजाम, रझाकार सरकारचा पूर्वनियोजित षडयंत्र हा काही वेगळाच होता. कारण, तारीख 21 रोजी बिलोली येथे कासिमरजवींची प्रचंड मोठी जाहीर सभा होती. (कासिमरजवी हा निजामाचा सेनापती होता आणि अत्यंत क्रूर अशी निमलष्करी रजाकार संघटना चालवायचा) त्या सभेसाठी शेकडो रजाकार तेथे उपस्थित होते. तत्कालीन निजाम सरकारच्या पूर्वनियोजित कटाप्रमाणे 21 ऑक्टोबर 1946 रोजी गोविंदरावांना जामीनावर सुटका करण्यात आली. गोविंदरावांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बैलगाड्या बांधून धर्माबादच्या दिशेने बिलोली कोर्टाहून वाटचाल करायला लागले. नेमकं त्याचवेळी बिलोली मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेकडो रजाकार उपस्थित होते. त्यावेळेस रजाकारांनी 'कासिमरजवी जिंदाबाद, पानसरे मुर्दाबाद' अशा अनेक घोषणा द्यायला सुरुवात केली. गोविंदरावांनी आपल्या बैलगाड्या आर्जापुरच्या दिशेने वळवल्या. पूर्वनियोजित कटाप्रमाणे दोन-तीन रजाकारांच्या गाड्या या बिलोली च्या अर्जापूर जवळ येऊन थांबलेल्या होत्या. आर्जापूरच्या जवळ जेव्हा गोविंदराव पानसरे यांच्या बैलगाड्या आल्या त्यावेळेस त्या बैलगाड्या अडवण्यात आल्या त्या रजाकारांची एक तुकडी गोविंदरावांच्या बैलगाडी समोर येऊन थांबली आणि त्या बैलगाडी समोर येऊन थांबल्यानंतर त्या तुकडीतील रजाकारांनी समोर येऊन म्हटले 'आप मे से पानसरे कौन है,हम पानसरे को काट देंगे' हे पाहून गोविंदरावांच्या बाकीचे सहकाऱ्यांना आपणही मारले जाणार हे लक्षात येताच ते मात्र पळून गेले. फक्त तेथे शिल्लक राहिले गोविंद पानसरे आणि त्यांचे निष्ठावंत अनुयायी पुंडलिक पाटील हंगरगेकर. पुंडलिक पाटलांनी रजाकाराच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले, 'मै हु पानसरे'. 'मै हु पानसरे' म्हटल्या नंतर रजाकारांच्या तलवारी सपासप वार करू लागल्या, पुंडलिकराव कोसळणार तोच पानसरे पुढे झाले आणि म्हणाले,अरे त्याला का मारता? मला मारा 'मै हु पानसरे,पहचानो मुझे मारना है तो मुझे मारो' आणि त्यांनी रजकरांपुढे आपली मान वाकवली. तेथे जर सर्वसामान्य माणूस असता तर जीवनवर्धनाची भीक मागितला असता. पण, गोविंदराव आणि पुंडलिकराव पाटील हे दोघेही हे दोघेही निर्भय होते देशभक्त होते! रजाकारांच्या तलवारी मान वाकल्या बरोबर चालायला लागल्या. त्या तलवारी, क्रूर तलवारी तोपर्यंत चालत राहिल्या जोपर्यंत गोविंदराव पानसरे यांचा शिर धडापासून वेगळं केलं जात नाही. त्या तलवारी थांबल्या नाही आणि गोविंद पानसरे हुतात्मा झाले. झालं, जे व्हायचं तेच झालं! मराठवाडा मुक्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा गोविंदराव पानसरे आणि असंख्य

ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझा विनम्र अभिवादन.

Gudmalwar kishan Laxman

B.A third year

संदर्भ:

१. लेखक आर्जापुर परिसरातील आहेत.

२.संबंधित माहिती इंटनेटवर उपलब्ध आहे.