सदस्य:Gajananmohite

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

*नरेंद्र मोदी करतील देशाला उध्वस्त, पुन्हा निवडून देऊ नका* ...अमित शहा...

*भाषांतरातील गोंधळाने खळबळ*  

बंगळुरू (BTM NEWS मराठी): दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारवर टिकेचा मारा करताना चुकून येडियुरप्पा सरकारवर अमित शाहांनी टिका केली होती. भ्रष्टाचारासाठी जर एखाद्या सरकारला बक्षीस द्यायची वेळ आलीच, तर ते येडियुरप्पा सरकार असेल, असे विधान अमित शाह यांनी केले होते. त्याच प्रमाणे भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी अमित शाह यांचं भाषण चुकीच्या पद्धतीनं भाषांतरित केल्याने . पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, दलित आणि मागास वर्गासाठी काहीही करणार नाहीत. ते देशाला उद्ध्वस्त करतील. तुम्ही त्यांना मतदान करू नये, असं अमित शाह म्हणाले.

उत्तर भारतीय भाजपा नेत्यांना दक्षिण भारतात प्रचार करण्यासाठी अनेकदा भाषेची अाडकाठी आडवी येते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये सभेसाठी गेले होते, तेंव्हा ही त्यांनी हिंदीतून भाषण केले होते. त्यावेळी ते भाषण अनेक लोकांना समजलेच नाही. कर्नाटकातील लोकांना हिंदी भाषा समजत नसल्याने

ब-याचदा अमित शाह यांचे हिंदीतील भाषण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे कन्नडमध्ये भाषांतरित करतात. तर काही ठिकाणी हे काम प्रल्हाद जोशी करतात. या घोळामुळे या पुढे विधानसभा क्षेत्रातील नेते हिंदीचं कन्नडमध्ये भाषांतर करून देणार आहेत, त्यावेळीच हिंदीतून कन्नडमध्ये भाषांतर करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते मदत सहकार्य करतील. भाजपा सरकार भाषांतरासाठी नेते आणि ट्रान्सलेटर यांची मदत घेत आहे. त्यामुळेच अशा चुका होत असल्याच स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर मात्र ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून यामुळे अमित शाहांची माञ चांगलीच फजिती झाली असल्याचे दिसून येत आहे.