सदस्य:Dr.Hiralal Gaikwad

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शासकीय विद्यानिकेतन केळापूर शासकीय विद्यानिकेतन केळापूर ही यवतमाळ जिल्ह्यातील एक नामांकित शाळा आहे. महाराष्ट्रातील पाच शासकीय विद्यानिकेतनापैकी शासकीय विद्यानिकेतन केळापूर हे एक विद्यानिकेतन.त्याची स्थापना सन 1981साली महाराष्ट्र शासनाने केली.त्यात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या निकषानुसार प्रवेश दिला जातो.त्यासाठी त्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षणाची मोफत सोय आहे. सुरुवातीला ही शाळा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी होती. एका वर्गात 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो अशी एकूण एकूण 300 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय आहे .परंतु सन 1996 पासून सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.ह्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. दरम्यानच्या काळात शासनाने नविन इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देऊन बांधकाम सुरू केले.परंतु काही केल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन संपत नव्हते म्हणून शासनाने सन 1996 मध्ये ही शाळा यवतमाळ येथे स्थलांतरित करून विद्यार्थ्यांचे आंदोलन शांत केले.परंतु काही वर्षांनी केळापूर येथील इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच ही शाळा पुन्हा एकदा केळापूर येथे स्थलांतरित करण्यात आली.