सदस्य:Dipti Krishna Ghure/धूपा१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वत्सला पांडुरंग कीर्तनी

वत्सला पांडुरंग कीर्तनी यांचा जन्म ०८ मे १९२४ रोजी सासष्टी तालुक्यातील मडगाव या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग कीर्तनी होते. त्यांनी मेट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले असून पुढे त्यांना हिंदी विषयात पांडित्य प्राप्त झाले होते. १८ जुन १९४६ रोजी डॉ. लोहिया आणि डॉ. ज्युलियाओ मिनेझिस यांच्या अटकेनंतर त्या भाषण देण्यासाठी पुढे गेल्या. त्यानंतर त्यांना पोलिस अधिकारी फिग्युरिदो यांनी अटक केली आणि त्यांनी 'जय हिंद' अशी घोषणा का केली असे विचारले, ज्यावर त्यांनी उत्तर दिले की, "जर 'व्हिवा सालाझार' ने अधिकारांच्या हृदयात अभिमान वाढवला, तर 'जय हिंदने' मला मुक्तीसाठी लढण्याची ताकद दिली." पुढे त्यांची सुटका व्हावी नाहीतर या सर्वांना अटक करावी, या मागणीसाठी सुमारे ४० महिलांची मिरवणूक पोलिस ठाण्यावर काढण्यात आली, या लाजिरवाण्या परिस्थितीमुळे पोलिसांनी त्यांना सोडले. परंतु त्यांनी  पोलिस कोठडीच्या बाहेर जाण्यास नकार दिला. शेवटी अधिकाऱ्यानेच त्यांना तुरुंगाबाहेर फेकून दिले. त्यानंतर त्यांनी मडगावात अध्यापनकार्य केले. आणि खाजगीरीत्या हिंदी वर्ग चालवले. नंतर त्या मुंबईला गेल्या आणि १९७० मध्ये अंधेरी माध्यमिक विद्यालयात शिक्षिका झाल्या. ललिता कंटक, मुक्ता कारापूरकर, श्रीमती कृष्णा हेगडे, विठा हेगडे, जीवन कारापूरकर, उमाबाई शिराली आणि इंदिरा भिसे ह्या त्यांच्या सहकारी होत्या. पुढे १६ नोव्हेंबर १९७१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

                         

संदर्भ ग्रंथ

१. Shirodkar, DR.P.P, ed. Who's Who Of Freedom Fighters, Vol. l. The Executive editor and member secretary, Goa Gazetteer department of Goa, Daman and Diu Panaji, December 1986, pg. no. 185.

२. सरदेसाई मनोहर हिरबा, कला आणि संस्कृती संचालनालय, १९८६, पृष्ठ क्र. ७९१