सदस्य:Deepak Durgaji shinde

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

           पेंडू ( बुद्रुक)        - हे गाव महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात आहे.         -पेंडू बुद्रुक या गावात एकूण 384 कुटुंब वास्तव्यास आहेत.हे गाव तालुक्‍याच्या ठिकाणापासून 10 किमी अंतरावर आहे.       - 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या  1980 आहे गावात एकूण पुरूष 886 व स्त्री 841 आहे आणि शून्य ते सहा वयोगटातील 250 बालके  आहेत.       - गावामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचे प्रसिद्ध असे मंदिर आहे. दर एकादशीला यांच्या दर्शनासाठी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून चालत येतात. या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह बसवला जातो, आणि कीर्तनाचे कार्यक्रम ठेवले जातात. आणि शेवटी त्यांच्या पालखीची रात्री 11 ते 4 मिरवणूक काढली जाते.नंतर दोन-तीन दिवस यात्रा भरते, एक दिवस पशुप्रदर्शन आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल असे कार्यक्रम आयोजिले जाते, व त्यांना योग्य अशी पारितोषिक दिले जाते.     -गावामध्ये एकूण चार वार्ड असून त्यामध्ये 11 सदस्य आहेत गावाच्या शेजारी नराटवाडी छोटेसे गाव असून या दोन गावातील  ग्रामपंचायत एक आहे.     - गावात एकूण साक्षरता 68.18% टक्के एवढी आहे.       - गावामध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे, ती पहिली ते सातवी पर्यंत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे मैदान आहे, शाळेच्या बाजूला एक महादेवाचे मंदिर आहे.    - एक मोठे मंगल कार्यालय आणि या मंगल कार्यालय आजूबाजूची सर्व गावातील लग्न समारंभ यामध्ये पार पाडली जातात.    - गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून शेती आहे गावातील 50 टक्के लोक शेती करतात,आणि तीस टक्के लोक नोकरी करतात, आणि 20 टक्के बिझनेस करतात.         -गावात सहा वर्षापर्यंतच्या बालकाच्या शिक्षणासाठी अंगणवाडी शाळा आहे.        -पंचायतराज कायद्यानुसार पेंडू बुद्रुक खेड्याचे व्यवस्थापन सरपंच (गाव प्रमुख) यांनी केले.गावामध्ये हटकर मराठा धनगर माळी या जातीचे लोक राहतात, गावांमध्ये जास्त प्रमाणात मराठा व हटकर जातीचे लोक आहेत.