सदस्य:DIU KHANVILKAR/धुळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुस्तकांचं गाव[संपादन]

भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. मा. ना. श्री. विनोद तावडे, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकार झालेला प्रकल्प आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेचा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांजवळचे गाव आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेला आणि जगाच्या नकाशावर पोहोचलेला अभिनव प्रकल्प आहे. हा प्रकल्प म्हणजे, “शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग” याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पुस्तके ठेवण्यासाठीची जागा घरमालक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन ह्यांच्याकडून प्रकल्पाला विनामोबदला उपलब्ध आहे.